महापालिका निवडणुका कधी होतील? आठवलेंनी सांगितला नेमका महिना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक महापालिका निवडणूका तोंडावर असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला रोज लावला आहे. परंतु या निवडणुका कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र महापालिका निवडणुका डिसेंबरपर्यंत होतील असा दावा केला आहे. आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, प्रभाग रचनेमुळे आणि अन्य काही कारणामुळे महापालिका निवडणूका रखडल्या आहेत. या सर्व निवडणुका लवकर व्हाव्यात हीच आमची ईच्छा आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला. आता निवडणुक आयोगानेही सध्या निवडणूका घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने विधान भवन परिसरात ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. त्यावरही आठवले यांनी कवितेतून पलटवार केला आहे. 50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या ओळीच आठवले यांनी म्हंटल्या.