गोव्यात न्यू इयर पार्टीसाठी बेस्ट क्लब कोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| न्यू इयर जवळ आलं की अनेकांचे गोव्याचे प्लॅन सुरू होतात. तुम्ही देखील यंदा गोव्यामध्ये नाईट आउटसाठी जाण्याचा आणि न्यू इयर पार्टी सेलिब्रेशनचा प्लॅन करत असाल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला गोव्यातील सर्वात बेस्ट क्लबची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गोव्यातील बेस्ट क्लब कुठे आणि कोणते आहेत?

नाइटलाईफ आणि पार्टीसाठी क्लब

1) Phantom club – गोव्यामधील बागा रोडला फँटम क्लब आहे. सध्या ख्रिसमस आणि न्यू इयरच्या निमित्ताने या क्लबमध्ये अनेक वेगवेगळ्या ऑफर सुरू आहेत. त्यामुळे अशा काळात तुम्ही या क्लबला व्हिजीट दिली तर तुम्हाला अनेक खास सोयी सुविधांचा स्वस्तात फायदा घेता येईल.

2) The Pink Elephant – गोव्यातील तीटोस गल्लीचे नाव आपण अनेकवेळा ऐकले असेल. ही गल्ली डान्स, क्लब, नाईट आउट पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. याच गल्लीत आहे द पिंक एलिफंट क्लब. या क्लबमध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचे जेवण, गोव्याच्या खासियत असलेल्या ड्रिंक्स आणि नाईट आउट पार्टीचे नियोजन करून मिळेल. त्यामुळे गोव्यात गेल्यावर या क्लबला नक्की भेट द्या.

3)Hammerz – कालंगुट बागा रोडला आहे , हॅमरझ नाईट क्लब. बीचच्या जवळ असलेल्या या नाईट क्लबमध्ये तुम्हाला न्यू इयर पार्टी तुम्हाला हवी तशा पद्धतीने एन्जॉय करता येईल. तसेच पार्टी एन्जॉय करत असताना तुम्ही जवळच असणाऱ्या बीचवर देखील जाऊ शकता. त्यामुळे यंदा गोव्यातील या क्लबला नक्की भेट द्या.

4) Titos club – गोव्यामध्ये नाईट आउट आणि पार्टीसाठी आणखीन एक सर्वोत्तम क्लब म्हणजे टीटोस क्लब होय. डान्स, जेवण, सेलिब्रेशन अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद तुम्हाला या क्लबमध्ये लुटता येईल. त्यामुळे गोव्यात गेल्यानंतर पार्टी आणि सेलिब्रेशनसाठी टीटोस क्लबला नक्की भेट द्या.