2023 वर्षांत कोणत्या इलेक्ट्रिक कार्सला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळाली? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2024 या नव्या वर्षांमध्ये अनेक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, 2023 मध्ये देखील अनेक वेगवेगळ्या कंपनीच्या इलेक्ट्रिक लॉन्च झाल्या. या गाड्यांना ग्राहकांकडून चांगली पसंती देखील मिळाली. महत्त्वाचे म्हणजे या सर्व गाड्या परवडणाऱ्या दरातील होत्या. चला तर मग पाहूया 2023 वर्षात कोणत्या इलेक्ट्रिक गाड्या ग्राहकांच्या पसंती पडल्या.

Audi Car

एक कोटीपेक्षा अधिक किंमत असणारी ऑडी कार बाजारामध्ये येतात तिला सर्वात जास्त मागणी मिळाली. यावर्षीच लॉन्च झालेली Audi Q8 e-tron ही इलेक्ट्रिक एसयूव्ही गाडी सर्वात जास्त चर्चेत ठरली. तसेच या गाडीमध्ये देण्यात आलेले वेगवेगळे फीचर्स आणि रेंजमुळे तिची मागणी देखील जास्त प्रमाणात करण्यात आली.

BMW

2023 वर्षात बीएमडब्ल्यू कंपनीची i7 ही इलेक्ट्रिक गाडी लॉन्च करण्यात आली. तब्बल अडीच कोटी रुपये किंमत असणाऱ्या या सेडान गाडीची रेंज 625 किलोमीटर आहे. यामुळेच तीला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळाली.

MG Comet

MG कंपनीने 2023 वर्षात Comet ही डबल डोअर इलेक्ट्रिक कार लाँच केली. त्यामुळेच ती भारतातील डबल डोअर इलेक्ट्रिक असणारी पहिली कार ठरली आहे. या कारची रेंज 230 किलोमीटर एवढी आहे. तर मूळ किंमत आठ लाख रुपयांपासून सुरू होते.

Tata Nexon

या कारने देखील बाजारात येतात ग्राहकांना वेड लावले. 14.74 लाख किंमत असणाऱ्या या कारमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स असल्यामुळे तिला खरेदी करण्याबाबत ग्राहकांची उत्सुकता दिसून आली. मुख्य म्हणजे, या कारची रेंज तब्बल 465 किलोमीटर असल्याचे कंपनीकडून सांगितले जाते.

Mahindra XUV400

यावर्षी बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Mahindra XUV400 कार लॉन्च झाली ही कार 456 किलोमीटर रेंज देते असा दावा कंपनीकडून केला गेला आहे. या कारची मूळ किंमत 15.99 लाख एवढी आहे.

Hyundai Ioniq5

2023 वर्षांमध्ये हुंडाई कंपनीने Ioniq5 ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. या कारची मुळ किंमत 45 लाख रुपये एवढी आहे. प्रीमियम लुक तसेच, मजबूत पॉवरट्रेन यामुळे यामुळे ही कार ग्राहकांच्या चांगलीच पसंती पडली.