हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगात AI म्हणजेच आर्टीफिशल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. अनेक कंपन्या आणि AI चा वापर करून आपलं काम सोप्प करत आहेत. काहीजण असेही म्हणत आहेत कि AI माणसासाठी धोकादायक आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जाणार असं मानणारा सुद्धा एक वर्ग आहे. मात्र आता हेच AI टूल कंपन्यांच्या बॉस साठी फायदेशीर ठरणार आहे. कारण वैज्ञानिकांनी असं एक एआय टूल विकसित केलं आहे, जे एखादा कर्मचारी कधी नोकरी सोडू शकतो याची माहिती कंपनीच्या बॉसला देईल.
कस शक्य आहे?
एखादा कर्मचारी कामावर असताना कशा पद्धतीने काम करतोय, किती कष्ट घेतोय. तसेच महिन्यापासून तो कर्मचारी किती सुट्ट्या घेतोय.. रोज तो ऑफिस मध्ये किती तास उपस्थित राहतो.. तसेच यापूर्वी त्याने कोणत्या कंपनीमध्ये किती दिवस काम केलं … या सर्व एकूण डेटाचे विश्लेषण हे AI टूल करेल. टोकियो सिटी विद्यापीठाचे प्राध्यापक नारुहिको शिरातोरी (Naruhiko Shiratori) यांनी एका स्टार्टअपच्या मदतीने हे टूल तयार केलं आहे. या AI टूल मुळे ऑफिस बॉसला चांगलाच फायदा होईल.
हे टूल बनवण्यासाठी, संशोधकांनी मागील अभ्यासाच्या आधारे विद्यापीठ सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा अंदाज लावण्यासाठी एआयचा वापर केला. ते आता अपग्रेडची योजना आखत आहेत जेणेकरुन एआय टूल नवीन कर्मचाऱ्यांसाठी नोकरीच्या मुलाखती, तसेच त्यांची वैशिष्ट्ये आणि वैयक्तिक इतिहासातील माहितीचे विश्लेषण करून त्यांना योग्य असाइनमेंट सुचवू शकेल. सध्या जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये या AI टूलची चाचणी सुरू आहे. या टूलमुळे एखादा कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत असेल तर त्याबाबत आधीच माहिती मॅनेजर्सना मिळणार आहे.