Congress : एका खासदारावरून काँग्रेस यंदा इतक्या जागा मिळवतेय; अचूक स्पष्ट निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुतारी, मशाल किती जागा मिळणार? अजितदादांना आणि शिंदेंना फटका बसणार का? भाजपची दिल्लीत सत्ता येणार का? असा कन्टेन्टचा काथ्याकुट सर्वांचा करून झाला. पण यात एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली. ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार? मुंबईत ठाकरेंचा, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा आणि संपूर्ण विदर्भ पट्टयात लोकसभेला कस लागला तो काँग्रेसचा. मविआच्या जागा वाटपात 17 जागा पदरात पाडून घेणाऱ्या काँग्रेसच्या किती उमेदवारांना निवडणुकीत यश मिळतय? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या चिन्हावर किती उमेदवार दिल्लीत जातील? याबाबत अंदाज बांधूया

सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रपासून. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तीन जागा लढवायला मिळाल्या त्यातला पहिला मतदारसंघ येतो तो सोलापूरचा… राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी इथली प्रमुख लढत झाली. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, असं चित्र आहे. दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूरचा…. काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी दिल्यापासूनच शिवसेनेचे संजय मंडलिक बॅकफुटला गेले होते. धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांच्या पाठीशी आपली सारी ताकद लावली असली तरी बंटी पाटलांच्या यंत्रणेपुढे तिचा निभाव लागताना दिसला नाही. मान आणि मत दोन्ही गादीलाच… या स्टॅन्डमुळे कोल्हापुरातही यंदा पंजा येतोय, हे क्लिअर आहे.

Lok Sabha Election : एका खासदारावरून Congress यंदा इतक्या जागा मिळवतेय,अचूक स्पष्ट निकाल,Nana Patole

तिसरा मतदार संघ आहे पुण्याचा… कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनी इथे भाजपला कडवी टक्कर दिली.मात्र स्ट्रॉंग केडर, शहरी मतदान, आमदारांची पाठीशी असणारी संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणारं होतं. त्यामुळे घासून लागणाऱ्या पुण्याच्या निकालात मुरलीधर मोहोळ निसटती बाजी मारतील, असं चित्र आहे .. चौथा मतदारसंघ आहे नंदुरबारचा…हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत अटीतटीची झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती. त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावितांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं. गोवाल पाडवी यांनी इथून तगड आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी कमळाच्या बाजूने झुकताना दिसतोय…

पाचवा मतदारसंघ आहे धुळ्याचा…धुळ्यात भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळे भामरे यांना यंदाही धुळ्यामधून अप्पर हँड आहे…स्ट्रॉंग कैंडिडेट नसणं ही काँग्रेसची धुळ्यातील चूक ठरली, असं आता अनेक राजकीय विश्लेषकही सांगतायत…. सहावा मतदारसंघ आहे लातूरचा…सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. पण स्टॅंडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील, असं लातूरमध्ये बोललं जातंय…

सातवा मतदार संघ येतो तो नांदेडचा… भाजपचे स्टॅंडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत झाली. चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एक इमेजसोबत भाजपचा बॅकअप चांगला लागल्याने नांदेडमध्येही पुन्हा एकदा कमळच फुलण्याचे चान्सेस जास्त आहेत….. आठवा मतदारसंघ आहे जालन्याचा. .. आपल्या सलग सहाव्या टर्मसाठी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपटले. मराठा आरक्षण हा जालन्याच्या संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला. दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात यंदा बरीच नाराजी होती. पण या नाराजीचं आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाही. मराठा मतांच्या विभाजनामुळे याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय, असं चित्रं आहे.

नववा मतदारसंघ आहे अकोल्याचा…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. अकोल्यात वंचितची हक्काची वोट बँक असल्याने अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणावरील मत विभाजनाचा धोका होता. दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र 2019 ला पाहायला मिळालं अगदी तशीच सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथे सोपा झालाय…दहावा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. एकूणच हाताचा पंजा इथून लीड घेईल असं मतदान सांगतंय.

अकरावा मतदारसंघ आहे रामटेकचा…रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदेंकडून राजू पारवे अशी रामटेकची लढत झाली. शिंदेंनी राजू पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेस मधून आयातवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला. काँग्रेसची दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक विकासाचं नरेटीव रामटेकमध्येही काँग्रेसला 4 तारखेला लीडमध्ये ठेवेल, असं इथलं चित्र आहे… बारावा मतदारसंघ आहे नागपूरचा…काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध भाजपचे नितीन गडकरी अशी इथली लढत झाली. आरएसएसचं मेन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो. म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील, असं बोलले जातंय…

तेरावा मतदारसंघ आहे भंडारा – गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढें आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत इथे घासून झाली. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी आणि काँग्रेसने लावलेली ताकद पाहता निसटत्या हाताने का होईना पण प्रशांत पडोळे जिंकतील, असं बोललं जातंय…चौदावा मतदारसंघ आहे गडचिरोली – चिमूरचा…भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामूळे गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली. मात्र पक्षीय बलाबल आणि कागदावरचं गणित भाजपच्या बाजूने असल्याने नेते सध्यातरी इथं लीडमध्ये दिसतायत…

पंधरावा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा…विदर्भातल्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलय. कारण इथे काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते. मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजा फिक्स असं सध्या वातावरण आहे. सोळावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा…मुंबई उत्तर हा भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ. म्हणूनच पक्षाने इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं. इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील. फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेतायत, हेच इथून पाहिलं जाणार आहे…

सतरावा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबईचा…. भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने उत्तर मध्य मधून पंजा निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.तर असा होता काँग्रेसने लढलेल्या 17 जागांचा संभाव्य निकाल.. बाकी तुमचाही अंदाज असा आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.