2023 मध्ये बॉलिवूड विश्वात कोणत्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या 2023 वर्ष सरत आले असून थोड्याच दिवसांनी 2024 हे नवे वर्ष सुरू होणार आहे. या नव्या वर्षात आपल्याला अनेक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्या सिरीज रिलीज होणार आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला 2023 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांवर नजर टाकण्याची देखील गरज आहे. कारण याचं चित्रपटांनी आपले 2023 काळात भरभरून मनोरंजन केले. तसेच, बॉलीवूड हॉलीवुड आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये धुमाकूळ माजवली. चला तर मग पाहुयात 2023 साली रिलीज झालेल्या चित्रपटांची यादी.

1) जवान / पठाण मूव्ही – 2023 वर्षांमध्ये शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला. जवान चित्रपटाने 1,148.32 करोड तर 1,050.30 करोडपेक्षा जास्त कमाई केली. जवान चित्रपटांमध्ये शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका नयनतारा या साउथच्या अभिनेत्रीने बजावली. तसेच, पठाण चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री दीपिका पदुकोण राहिली.

2) जेलर – या वर्षांमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर चित्रपट देखील रिलीज झाला. या चित्रपटाने साऊथच्या सर्व चित्रपटांना मागे टाकत बक्कळ कमाई केली. खास म्हणजे, जेलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 610 कोटींचा गल्ला केला. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेता विनायकन, राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, सुनील , मिर्ना मेनन आणि योगी बाबू असे सह कलाकार मुख्य भूमिकेत होते.

3) द केरला स्टोरी – 2023 वर्षात देशभरात सर्वात चर्चेचा मूव्ही ठरला तो म्हणजे द केरला स्टोरी. सुदीप्तो सेन दिग्दर्शित केरला स्टोरी चित्रपटांमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळे या चित्रपटावर अनेकांकडून टीका देखील करण्यात आली. हा चित्रपट देशभरात चर्चेत राहिल्यामुळे त्याने बॉक्स ऑफिसवर 3030.97 कोटींची कमाई केली.

4) अनिमल – वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित असणारा अनिमल चित्रपट 2023 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रिलीज होतात, दोन दिवसात कोट्यावधींची कमाई केली. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका अभिनेता रणवीर कपूर याने साकारली आहे. तसेच त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी असे सह कलाकार देखील आहेत.

2023 वर्षांमध्ये बॉलीवूड विश्वात आदीपुरुष, गदर 2, टायगर 3, तू झुटी मैं मक्कार, रॉकी और रानी की प्रेम कहानी असे इतर चित्रपट देखील प्रदर्शित झाले. या सर्व चित्रपटांनी मिळून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. यातील कोणत्याही चित्रपटाने प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्यात कसर सोडली नाही. तसेच, या चित्रपटांबरोबर इतरही काही चित्रपट रिलीज झाले ज्यामध्ये , Sam बहादुर, ओ माय गॉड टू, सत्यप्रेम की कथा, सिर्फ एक बंदा काफी है, गांधी गोडसे एक युद्ध, मिशन मजनू, बवाल, यारिया 2 अशा चित्रपटांचा समावेश आहे.