सध्याच्या शहरी वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. म्हणूंच शहरातील लोक निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त ठिकणांना भेटी देणे पसंत करतात. भारतात देखील अशी काही ठिकाणे आहेत जिथे प्रदूषण कमी असून तेथील हवा स्वच्छ आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा नेहमी या ठिकाणांवर असतो. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल …
मनाली
तुम्हाला सुंदर पर्वत पहायचे असतील आणि स्वच्छ हवेत श्वास घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला भेट देऊ शकता. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे पर्वतांवर बर्फ पडतो त्यामुळे अनेक लोक खास बर्फ अनुभवण्यासाठी या ठिकाणी जात असतात.
कोल्लम
तुम्हाला हिरवाई, निसर्गरम्य दृश्ये आणि मोकळ्या हवेत फिरायचे असेल तर तुम्ही केरळमधील कोल्लमला भेट देऊ शकता. तुम्हाला इथे खूप छान वाटेल.
गंगटोक
प्रदूषणापासून दूर चांगल्या हवेत श्वास घ्यायचा असेल तर सिक्कीममधील गंगटोकला जाता येईल. इथल्या हवेत तुम्हाला खूप ताजेपणा जाणवेल.
तेजपूर
तेजपूर हे सर्वात कमी प्रदूषित ठिकाणांपैकी एक आहे. हे आसाम मध्ये वसलेले आहे. तुम्हाला इथे खूप कमी प्रदूषण आढळेल. अशा परिस्थितीत, तुम्ही तेजपूरमध्ये काही दिवस सहलीचा प्लॅन करू शकता. या ठिकाणी इतरही काही पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत.
पुद्दुचेरी
तुम्हाला सुंदर नजारे पहायचे असतील आणि प्रदूषणापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही तामिळनाडूतील पुडुचेरीला जाऊ शकता. इथल्या वातावरणात फिरून तुम्हाला नक्कीच रिफ्रेशमेंट मिळेल यात शंका नाही.