White Brinjal Farming | पांढऱ्या वांग्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतीये वरदान, वर्षभरातच होतील मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आता उन्हाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे. या ऋतूमध्ये अनेक शेतकरी वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात. वांग्याला बाजारात देखील खूप चांगली मागणी आहे. आतापर्यंत आपण निळ्या त्याचप्रमाणे हिरव्या आणि जांभळ्या रंगाची वांगी पाहिलेली आहेत. परंतु तुम्ही कधी पांढऱ्या रंगाची वांगी (White Brinjal Farming) पाहिलेली आहेत का? पांढऱ्या रंगाची वांगी ही अगदी अंड्यासारखी दिसतात. त्याचा आकार देखील अंड्या एवढाच असतो. आणि या वांग्यांना बाजारात सध्या मोठी मागणी आहे. अगदी परदेशातूनही या पांढऱ्या वांग्यांना मागणी वाढत आहे. वांग्याची ही एक अशी जात आहे, ज्या जातीची लागवड करून शेतकरी खूप चांगला नफा मिळू शकतात. वर्षातील कोणत्याही हंगामात शेतकरी या वांग्याची लागवड करू शकतात.

कमी वेळात होईल जास्त कमाई | White Brinjal Farming

या पांढऱ्या जातीच्या वांग्यांची लागवडीसाठी 1 फेब्रुवारी ते मार्च हा महिना मानला जातो. फेब्रुवारीच्या अखेरपासून मागच्या सुरुवातीपर्यंत शेतकरी यामध्ये पेरणी करू शकतात. जून ते जुलै या महिन्यादरम्यान पांढरी वांगी ही पूर्णपणे तयार होतात. जी बाजारात सहज विकता येतात. त्यातून खूप चांगला नफा देखील मिळतो. कमी वेळात अधिक उत्पन्न घ्यायचे असेल, तर तुम्ही या पांढऱ्या वांग्यांची (White Brinjal Farming) लागवड करू शकता.

पांढऱ्या वांग्याची पेरणी

या जातीची पेरणी करण्यासाठी एक बेड तयार करावा लागतो. तुम्ही यासाठी दीड मीटर लांब आणि तीन मीटर रुंद असा एक बेड तयार करा. त्यावर पूर्ण माती पसरवायची आहे. प्रत्येक बेडवर तुम्हाला 200 ते 250 ग्रॅम डीएपी टाकावी लागेल. बेडमध्ये हा डीएपी टाकल्यानंतर एक रेष काढा आणि त्यामध्ये पांढऱ्या वांग्याचे बी पेरा.

या भागात होते पांढऱ्या वांग्याचे उत्पन्न

भारतामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांमध्ये पांढऱ्या वांग्याची लागवड केली जाते. परंतु जम्मूमध्ये सर्वात जास्त या पांढऱ्या वांग्याची लागवड केली जाते. त्यामुळे या वांग्याची लागवड करण्यासाठी अनेक शेतकरी हे जम्मूवरून बियाणे आणतात. इतर वांग्याच्या तुलनेमध्ये पांढऱ्या वांग्यांमध्ये अधिक पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळेच या वांग्याला बाजारात खूप जास्त मागणी आहे.