हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Hair Remedy) बिघडती जीवनशैली वृद्ध, तरुण ते अगदी लहान मुलांच्या आरोग्यावरसुद्धा अत्यंत वाईट परिणाम करत असते. कामाचा ताण, घरगुती व्याप आणि अभ्यासाचे टेंशन यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या वाढू लागली आहे. केस कितीही लांबसडक, घनदाट असले तरीही त्यातून एखादा पांढरा केस डोकावू लागला की, लूक खराब होतो. मग अशावेळी बरेच लोक केसांना कृत्रिम कलर लावून केस काळे करतात. असे रंग आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
यावर सगळ्यात उत्तम असा घरगुती उपाय आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात खडा मसाला हा असतोच. ज्यामध्ये आढळणारी छोटीशी लवंग अत्यंत बहुगुणी मानली जाते. (White Hair Remedy) आकाराने अतिशय लहान दिसणारी लवंग विविध प्रकारे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. तीच लवंग तुमचे पांढरे झालेले केस काळे करण्यास मदत करू शकते. आता यासाठी लवंगचा वापर कसा करायचा? ते तुम्हाला माहित असायला हवे. हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी लवंग कशी वापराल?
जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील तर तुमच्यासाठी छोटीशी लवंग खु फायद्याची ठरू शकते. (White Hair Remedy) यासाठी तुम्हाला लवंगापासून एक खास हेअर पॅक तयार करायचा आहे. ही प्रक्रिया मेहंदी लावण्यासारखीच सोपी आहे. पण जराशी वेगळी आहे. आता हा हेअर पॅक कसा बनवायचा आणि कसा वापरायचा ते जाणून घेऊया.
असा बनवा हेअरपॅक (White Hair Remedy)
यासाठी तुम्हाला १० ग्रॅम लवंग पुरेशी आहे. ही लवंग ३ चमचे एरंडेल तेलात मिसळा. दुसरीकडे एका छोट्या भांड्यात पाणी उकल आणि यामध्ये लवंग, एरंडेल तेल टाका. हे हॅन्ड किमान १० मिनिटे झाकून पाणी उकळून घ्या. आता यामध्ये १ लहान वाटी आवळा पावडर घाला आणि त्यात थोडे पाणी घालून याची स्मूथ पेस्ट बनवा.
असा करा वापर
तयार झालेली पेस्ट केसाला हाताने व्यवस्थित लावा. किमान ४० मिनिटे हा हेअरपॅक असाच सुकू द्या. (White Hair Remedy) त्यानंतर हलक्या कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. एका महिन्यात सुमारे ३ वेळा हा हेअरपॅक लावा.
कसे करते काम?
लवंगमध्ये असणारे उच्च युजेनॉल नैसर्गिकरित्या केस वाढवण्यासाठी फायदेशरीररित्या काम करतात. (White Hair Remedy) या युजेनॉलमध्ये असणारे अँटि ऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेशनच्या नुकसानापासून केसाच्या मुळांचे आणि फॉलिकल्सचे संरक्षण करत. ज्यामुळे अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत मिळते.