तुम्हाला चुकीची बातमी कुणी दिली ?, निधनाच्या बातमीवरून संतापल्या सुमित्रा महाजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभेचे माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून झळकली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला. मात्र ही बातमी फेक असल्याचे स्पष्ट झाले. माध्यमांनी देखील ही बातमी चालवली. मात्र जेव्हा सुमित्रा महाजन यांना ही बातमी कळाली तेव्हा मात्र त्यांनी माध्यमांना चांगलेच सुनावले.

शशी थरूर यांनी केले होते ट्वीट

सुमित्रा महाजन म्हणाल्या, की खात्री केल्याशिवाय माध्यमांनी अशा प्रकारचं वृत्त प्रसारित करणं अत्यंत चुकीचं आहे. माध्यमांनी निदान प्रशासनाकडून या वृत्ताबाबत खात्री करुन घ्यायला हवी होती. पुढे त्या म्हणाल्या, की माध्यमांमध्ये ही बातमी पाहिल्यानंतर मुंबईतून मला माझ्या अनेक नातेवाईकांचे फोन आले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली होती, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की शशी थरुर यांचं ट्विट माझ्या भाचीनं रिट्विट केलं आणि तिनं त्यांना सवालही विचारला, की मी सुमित्रा महाजन यांची भाची आहे, तुम्हाला ही चुकीची बातमी कोणी दिली? या वृत्तामागे काहीतरी गडबड असल्याचंही महाजन यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी असा सवालही उपस्थित केला, की मुंबईतील चॅनेलनंच अशा प्रकारचं वृत्त का दिलं, यामागे काहीतरी गडबड असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली.

Leave a Comment