हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये इमर्जेन्सी साठी भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या लसी वापरण्यास परवानगी दिली गेली आहे. यानुसार या दोन्ही लसी देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहचल्या आहेत. भारत बायोटेक्ने कोविड 19 साठी बनवलेल्या लसीसाठी काही सूचना जारी केल्या असून यामध्ये ही लस कोणी घेऊ नये यासंदर्भात सांगितले आहे.
भारत बायोटेकणे जारी केलेल्या सूचना नुसार, कोवॅक्सिन ही लस खालील लोकांनी घेऊ नये. यामध्ये ॲलर्जी असेल तर, खूप जास्त ताप येऊन गेला असेल तर, रक्ता संदर्भात आजार असेल तर, प्रतिकारशक्ती कमजोर असेल आणि त्यासाठी औषधे सुरू असतील तर, गरोदर असेल तर, स्तनपान देणाऱ्या माता, इतर करोणा संदर्भातील लस यापूर्वी घेतली असेल तर आणि इतर कुठला गंभीर स्वरूपातील आजार असेल तर त्यांनी कोवॅक्सिन ही लस घेऊ नये असे भारत बायोटेक कंपनीने सूचना जरी करून म्हटले आहे.
भारतामध्ये सद्ध्या भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोविशिल्ड या लसिंना परवानगी मिळाली आहे. सोबतच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याचा या संदर्भातील करार असून ती लसही बाजारात काही दिवसात येईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लासिकरणासाठी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.