विमानतळावर बायडेन यांना भेटण्यासाठी आलेली ती मुलगी कोण? सोशल मीडियावर Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीत 9 ते 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 परिषदेसाठी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) भारतात दाखल झाले आहेत. त्यांचे सर्वात प्रथम पालम विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांकडून भव्य असे स्वागत करण्यात आले. परंतु याचंवेळी जो बायडेन यांचे लक्ष एका लहान चिमुकलीने वेधून घेतले. तिला पाहताच जो बायडेन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. यानंतर ते स्वतः त्या मुली जवळ गेले आणि तिला मिठी मारली. तसेच तिच्या सोबत गप्पादेखील मारल्या. या सर्व प्रकारानंतर आता सोशल मीडियावर जो बायडेन यांना भेटायला आलेली ही मुलगी कोण होते असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या सोशल मीडियावर जो बायडेन आणि या चिमुकलीच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, सर्वात प्रथम जो बाइटन विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री व्हीके सिंग आणि अनेक उच्चपदस्थ अधिकारी यांच्याकडून करण्यात आले. यावेळी जो बाइटन यांनी देखील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढे आल्यानंतर त्यांना एक लहान मुलगी दिसली. ती देखील जो बायडेन यांच्या स्वागतासाठी राजदूत एरिक गार्सेटी यांच्या सोबत आली होती. जो बाइटन यांनी त्या मुलीशी संवाद साधला. तीला मिठी मारली. तसेच तिच्याशी बातचीत केली. यामुळेच ही मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडला.

तुम्हाला सांगू इच्छितो की, जो बाइटन यांना खास भेटण्यासाठी आलेली ही मुलगी अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी (Eric Garcetti) यांची मुलगी आहे. तिचे नाव माया (Maya Garcetti) असे आहे. एरिक गार्सेटी यांच्यासोबत माया देखील बाइटन यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर आली होती. मायाला पाहिल्यानंतरच जो बाइटन यांच्या चेहऱ्यावर हसू आले. यानंतर त्यांनी मायाला मिठी मारली. माया आणि बायडेन यांचे मुलीसोबत छायाचित्रे व्हायरल झाले आहेत.

माया याआधीही चर्चेत आली होती

एरिक गार्सेटी यांची मुलगी माया गार्सेटी यापूर्वी देखील चर्चेत आली होती. एरिक गार्सेट्टी यांना राजदूत बनवल्यानंतर ज्यावेळी एरिक यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता तेव्हा माया बायबल हातात घेऊन उभी राहिली होती. तिच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता ती पुन्हा जो बाइटन यांच्यासोबत प्रकाशझोतात आली आहे.