प्रभू श्रीराम यांची मूर्ती घडविणारे शिल्पकार अरुण योगीराज कोण आहेत? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठीच सोमवारी राम मंदिरात प्रभू श्रीरामच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रभू यांची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली आहे, ती म्हैसूर (कर्नाटक)चे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली आहे. एकूण तीन मुर्त्यांपैकी अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती निवडण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी X वरून दिली आहे.

प्रभू राम यांची मूर्ती निवडण्यात आल्याची माहिती देत मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, “अयोध्येमध्ये भगवान श्री रामामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार, आमची शान अरुण योगीराज यांनी बनवलेली रामाची मूर्ती अयोध्येत बसवली जाणार आहे. राम हनुमानाच्या अतूट नात्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील रामललासाठी ही एक महत्त्वाची सेवा आहे यात शंका नाही”

अरुण योगीराज कोण आहेत?

मुख्य म्हणजे, अयोध्येत बसवण्यात येणाऱ्या प्रभू राम यांच्या मूर्तीची निवड करण्यात झाल्यानंतर मूर्ती घडवणारे अरुण योगीराज हे कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ही मूर्ती घडवणारे 37 वर्षीय अरुण योगीराज कर्नाटक मधील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुण योगीराज यांच्या वडिलांची ओळख वाडियार घराण्याच्या राजवाड्यांच्या कामासाठी देखील आहे. यात 2008 झाली अरुण योगीराज यांनी म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

यापूर्वी अरुण योगीराज यांनी सुभाष चंद्र बोस यांचा 30 फूट उंच असलेला पुतळा बनवला होता. जो इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे बसवण्यात आला आहे. हा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील दाखवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अरुण योगीराज यांचे भरभरून कौतुक केले होते. तसेच त्यांची भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर मागे अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची 12 फूट उंचीची मूर्ती बनवली होती. त्यानंतर आता अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीराम यांची मूर्ती बनवली आहे. ज्यामुळे ते जास्त चर्चेत आले आहेत.