Gujarat Election 2022 : कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? AAP ने बनवला मास्टर प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून १ आणि ५ डिसेंबरला म्हणजेच २ टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपचा आणि खास करून मोदी शहांचा बाल्लेकिल्ला असलेल्या गुजरात मध्ये यंदा आम आदमी पक्षाचे आव्हान भाजप पुढे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासुन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे आणि मतदारांना अनेक मोठमोठी आश्वासने दिली आहेत. त्यातच आता या निवडणुकीसाठी आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे केजरीवाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपचा चेहरा कोण असावा यासाठी जनतेचे मत मागवण्यात आल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून जनतेकडून मिळालेल्या मताच्या आधारे पक्षाकडून मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवण्यात येणार आहे. गुजरातमधील जनतेला एसएमएस, व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेल आणि ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आपने यापूर्वी पंजाबमध्येही असाच जनमताचा कौल घेतला होता.

दरम्यान, आजच केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. मतदानासाठी गुजरातमध्ये एकूण 51हजार 782 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या १८२ जागा आहेत. यापूर्वी २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळाली होती. तेव्हा काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या भाजपने 99 जागा जिंकल्या. यंदा मात्र भाजपपुढे आम आदमी पक्षाचे कडवे आव्हान असून मोदी शहांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.