हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लॅक डायमंड, खनिजानं समृद्ध असणारी भूमी म्हणून विदर्भात नावावरुपास आलेला मतदारसंघ म्हणजे वणी… तसं पाहायला गेलं तर काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असणाऱ्या वणीमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजपच्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी वर्चस्वाचं राजकारण केलं. पण लोकसभेला भाजपचं मायनसमध्ये जाणं ते बोदकुलवार यांच्या विषयी असणारी अँटी इनकंबनसी यामुळे काँग्रेसचा यंदा आमदार फिक्स, अशी एकूणच ग्राउंड रियालिटी आहे… पण काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार? यावरती एक भलं मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित करता येऊ शकतं… भाजपाच्या बोदकुलवार यांचा टांगा जागेवर पलटी करण्याची हिम्मत वणीच्या कुठल्या उमेदवाराच्या हातात आहे? त्याचंच हे पॉलिटिकल डिकोडिंग…
मागील पंधरा वर्षांमध्ये या मतदारसंघांतील परिवर्तनवादी मतदारांनी वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. 1990 ते 1999 या काळामध्ये या भागातून काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी बाजी मारली. मात्र 2004 मध्ये शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांनी वणी विधानसभेमध्ये प्रथमच भगवा फडकवला. त्यानंतर शिवसेनेची ताकद सुद्धा वाढत गेली. 2009 मध्ये काँग्रेसचे वामनराव कासावर यांनी मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. 2014 च्या मोदी लाटेत भाजपचे नवीन उमेदवार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी भाजपला इथं बस्तान बांधून दिलं.. आणि ते तब्बल एक दशक आमदारकीवर ठाण मांडून बसले… पण यंदाचा लोकसभेचा निकाल क्लिअर कट सांगतोय, यंदा वणीत फक्त आणि फक्त काँग्रेसचाच उमेदवार येईल… खरतर मागील दोन टर्म भाजपच्या बोदकूरवार यांच्या विरोधात काँग्रेसने वामनराव कासावार यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवलं… पण त्यांची मतदारसंघातली सध्याची निष्क्रियता पाहता, काँग्रेसचा राजकीय चेहरा म्हणून कार्यकर्त्यांमध्ये आलेला साचलेपणा पाहता एक फ्रेश चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून होतेय…
यातलं पहिलं नाव येतं ते संजय खाडे यांचं… कासावार यांचे मायनस मध्ये जाणारे मुद्दे पाहता यंदा काँग्रेस खाडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे जवळपास कन्फर्म समजलं जातंय… यामागचं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कोणता असेल? तर तो कुणबी वॉटर्सचा… भाजप आणि काँग्रेस सुरुवातीपासूनच कुणबी समाजचं मताधिक्य असणाऱ्या या मतदार संघात नेहमी नॉन कुणबी उमेदवारांना संधी देऊनच लढत दिली गेली… लोकसभेला प्रतिभा धानोरकर यांनी खासदारकीचा गुलाल कपाळाला लावल्याने खाडेंना उमेदवारी देणं काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतं… एकतर कुणबी समाज एकगठ्ठा खाडेंच्या पाठीशी राहील… त्याचवेळेला धानोरकर गटही संजय खाडे यांच्या पाठीशी विधानसभेला ताकद लावू शकतील… त्यात दगडा जनसंपर्क असणारा फ्रेश चेहरा, बँकेचे जाळं आणि भव्य विदर्भ शंकर पटाच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या खाडेंचा स्वतःचा असा एक व्होट बँक आहे…
कापूस पणन महासंघ सोबतच चालतं फिरतं जनहित केंद्र सारख्या उपक्रमांच्या माध्यमातूनही खाडेंच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे… त्यामुळे कुणबी फॅक्टर, संस्थात्मक जाळ, सामाजिक ते क्रीडा क्षेत्रापर्यंतची मुशाफिरी या सगळ्या गोष्टी निकालात सध्यातरी खाडेंना अप्पर हँड देताना दिसतील… बाकी महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे संजय देरकर यांचं नाव प्रकर्षाने समोर येतंय… ठाकरे गट वणीच्या उमेदवारीसाठी अडून बसला, तर वणीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो… मनसेकडून राजू उंबरकर यांनीही वणीसाठी तयारी केली आहेच…
दुसऱ्या बाजूला भाजपकडून विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांची उमेदवारी कन्फर्म समजली जातेच आहे.. पण मतदार संघात आलेला साचलेपणा, आमदार साहेबांमुळे रखडलेली विकास कामे आणि अँटी इन्कंबलसी पाहता भाजप नव्या चेहऱ्याचा आमदारकीसाठी विचार करू शकतो… तेव्हा बोदकुरवार यांचे विरोधात भाजपकडून तारेंद्र बोरडे, विजय चोरडिया, रवी बेलुरकर यांचीही नावं सध्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत… पण हे सगळं असलं तरी जो कुणबी उमेदवार देईल…. तो निवडून येईल… असं काहीसं वणीच्या जनतेचा राजकीय सुरू उमटतोय….
या मतदारसंघात वणी आणि झरी तालुक्यातील काही भागांमध्ये कोळसा खाणी आहेत, मात्र मारेगावसारखा तालुका वणीपासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर असल्याने वणीची सावली नेहमीच मारेगाव येथे पाहायला मिळते. मारेगावचे सर्व व्यवहार वणी येथे होतांना दिसतात. त्यामुळे मारेगावच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष होत आलंय… मतदार संघातली एमआयडीसीही फक्त नावापुरतीच आहे… उद्योगांच्या नावाने बोंब आहे… सोबतच हाताला काम – खिशाला दाम याचा विचार जनता लांब लांब पर्यंत करीत नाहीये… एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट गोल्ड. कापसाची मोठी बाजारपेठ असूनही या मतदारसंघात सूतगिरणी उद्योग नाही. ज्या सूतगिरण्या सुरु झाल्या.. आणि बंदही पडल्या… रुग्णालयीन आणि शासकीय कर्मचाऱ्यांची मनमानी, आरोग्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा, चंद्रपुरातून स्थलांतरित झालेला दारू व्यापार – आणि त्या पाठोपाठ बिघडलेली मतदार संघाचं सामाजिक स्वास्थ्य आणि नुसत्या घोषणा करूनही रस्त्यावर दिसणाऱ्या रस्त्यांची चाळण… हे सगळं पाहता यंदा मतदार संघात सत्तांतर तर होणारच, पण उमेदवार निवडताना काँग्रेसला अनेक सोशिओ पॉलिटिकल फॅक्टरचा विचार करावा लागेल एवढं मात्र नक्की…