Wholesale Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा!! ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर घसरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक वर्षांपासून सततच्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई निच्चांकी (Wholesale Inflation Rate) पातळीवर गेला आहे. भाज्या आणि इंधनाच्या किमती घसरल्याने घाऊक महागाईचा आकडा सुद्धा खाली गेला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई एक वर्षापूर्वीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये 1.31% होती. त्यामुळे सणासुदीच्या काळात देशातील जनतेला काही प्रमाणात का असेना प[पण दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

घाऊक महागाई दर का घसरला – Wholesale Inflation Rate

खरं तर यापूर्वी घाऊक महागाईचा दर (Wholesale Inflation Rate) हा जूनमध्ये वाढलेला होता, 16 महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन तो 3.43% इतका होता. मात्र जुलै महिन्यात या दरात घसरण झाली, त्यावेळी घाऊक महागाईचा दर 2.04%होता. याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘खाद्य वस्तू, प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ तसेच कापड आणि मशिनरी उत्पादनाशी संबंधित किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे महागाई ऑगस्टमध्ये सकारात्मक राहिली. भाज्यांच्या घाऊक महागाईचा दर एका वर्षापूर्वी 48.44% होता तो आता मायनस 10.11% झाला आहे. तथापि, बटाट्याची महागाई 77.96% आणि कांद्याची महागाई एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 66.75% होती. डाळींचा आकडा 18.57% होता.

टोमॅटो आणि कांद्याच्या किमतीत घट झाल्यामुळे भाजीपाल्याची महागाई कमी झाली आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे इंधन आणि उर्जा महागाई मायनस ०.७% वर घसरली. येत्या काही महिन्यांत घाऊक महागाई आणखी कमी होईल असा अंदाज आता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण येत्या काही दिवसात नवरात्री, दसरा आणि दिवाळी सारखे सण येत आहेत.