हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा, हे प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे स्वप्न असते. विमानाने प्रवास करणे हे अत्यंत सोयीचं असतं. तसेच वेळ देखील कमी लागला, तरी विमानाने प्रवास करणे हे खर्चिक असते. विमानाने प्रवास करताना अनेक नियम आणि निर्बंध लादले जातात. विमानाने प्रवास करताना तुम्ही तुमच्या सोबत कोणत्या वस्तू नेऊ शकता? कोणत्या नाही? याचे देखील नियम आहेत. जर तुम्ही नियमाच्या बाहेर असणारी कोणती वस्तू नेली, तर ती तुम्हाला विमानतळावरच सोडून द्यावी लागते. अन्यथा तुम्हाला फ्लाईटने प्रवास करून देत नाही. परंतु जर तुम्ही देखील आता काही दिवसात पहिल्यांदाच फ्लाईटने प्रवास करत असाल, तर आपण विमानात कोणत्या गोष्टीने घेऊन जाव्यात तसेच कोणत्या गोष्टी नेऊ नयेत. याबद्दलच्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
विमानाने प्रवास करताना कोणत्याही नागरिकाला लाइटर, ड्राय सेल बॅटरी सारख्या ज्वलनशील वस्तू त्याचप्रमाणे चाकू, ब्लेड यांसारख्या धारदार आणि तीक्ष्ण वस्तू घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. या गोष्टींना अनेक कारणं आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? विमानातून तुम्हाला वाळलेलं नारळ किंवा सुक खोबरं घेऊन जाण्यासाठी देखील बंदी आहे. आता वाळलेल्या खोबऱ्याचा आणि विमानाने प्रवास करण्याचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. जेव्हा लोक देशाबाहेर राहत असतात. त्यावेळी तिथे जाताना अनेक घरगुती भारतीय पदार्थ ते घेऊन जात असतात. त्यातील सुक खोबरं हा एक प्रकार आहे. परंतु सुक खोबरं तसेच नारळ फ्लाईट मधून नेण्यास पूर्णपणे बंदी आहे.
एव्हिएशन ट्रेनिंग इंडियाचे एज्युएशन तज्ञ रामगोपाल यांनी सांगितल्याप्रमाणे वाळलेल्या नारळाचे बाहेरील कवच हे खूप कठीण असते. आणि ते एका शस्त्राप्रमाणे काम करू शकते. जर कोणतीही आणीबाणी आली, तर यामुळे विमानाचे नुकसान होऊ शकते. आणि इतर प्रवाशांना इजा होऊ शकते. यामुळे सुके नारळ फ्लाईटमधून नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. अशा प्रकारचे कोणतेही कठीण पदार्थ नेण्यास फ्लाईटमध्ये बंदी आहे.
तसेच विमान चालक तज्ञांच्या मते, नारळाच्या बाह्यकवचाचे तुकडे पटकन होतात. आणि ते तुकडे इतरत्र जाऊन लोकांना लागू शकतात. आणि त्याची इजा देखील होऊ शकते. सुक्या नारळात ओलावा असतो. त्यामुळे केबिनच्या हवेच्या गुणवत्तेत देखील यामुळे बदल होऊ शकतो. या सगळ्या नियमांमुळे आणि कारणांमुळे फ्लाईटमधून नारळ घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. जर काही कारणास्तव ही परवानगी दिली, तर त्यांना फक्त चेक इन मध्येच सुका नारळ घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली जाते.