हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्हाला माहीत आहे का की रोल्स रॉयस कार सर्वात महागडी कार आहे. तसेच, ही कार खरेदी करण्यासाठी इतरही अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. रोल्स रॉयसचा संबंध रॉयल्टीशी आहे. त्याचबरोबर, ही कार शाही शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे रोल्स रॉयल कार एका खास गोष्टीसाठी देखील प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे, या कार सोबत देण्यात येणारी महागडी छत्री. रोल्स रॉयस सोबत एक छत्री देण्यात येते. ती नेमकी कोणत्या कारणासाठी देण्यात येते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
छत्री देण्याचे कारण?
रोल्स रॉयस कारच्या दरवाजाला बाजूला आपल्याला एक छत्री दिसून येते. ही छत्री देण्यामागील कंपनीचे कारण म्हणजे, या कारची ओळख इतर कारपेक्षा नेहमी वेगळी रहावी. तसेच कारची काहीतरी वेगळी खासियत असावी म्हणून देखील या छत्रीला कार सोबत जोडण्यात आले आहे. असे म्हणतात की, पूर्वीच्या काळी ब्रिटिश लोक छत्रीचा जास्त प्रमाणात वापर करायचे. त्यामुळे पाऊस असो किंवा ऊन यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते नेहमी छत्री वापरत असे. याच गोष्टीला लक्षात घेऊन कंपनीने देखील कारसोबत छत्री दिली आहे.
ही छत्री रोल्स रॉयसच्या महत्त्वाच्या उत्पादनांपैकी एक आहे. रोल्स रॉयस कारमध्ये या छत्रीसाठी एक खास जागा तयार करण्यात आली आहे. रोल्स रॉयसच्या दरवाज्याच्या बाजूला ही छत्री आत मध्ये ठेवण्यात आलेली असते. तुम्ही त्या जवळील बटन दाबले की छत्री बाहेर येते. तसेच छत्री उघडण्यासाठी देखील एक बटन देण्यात आले आहे. ते बटन दाबल्यानंतर छत्री लगेच उघडते. या छत्रीवर कार प्रमाणेच रोल्स रॉयसचा लोगो देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ही छत्री देखील तितकीच आलिशान आणि सुंदर दिसते.
छत्रीची किंमत किती?
ही छत्री आपल्याला सहज खरेदी करता येऊ शकते. परंतु ही छत्री खरेदी करण्यासाठी आपल्याला यासाठी 700 डॉलर्स खर्च करावे लागतील. थोडक्यात, भारतीय चलनानुसार, ही छत्री आपल्याला 52 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकते. तुम्ही ही छत्री ऑनलाइन माध्यमातून ऑर्डर करू शकता. तसेच या छत्रीमध्ये वेगवेगळे रंग निवडू शकता.