ट्रकच्या मागे Horn OK Please का लिहिलेलं असतं? कारण पाहून तुम्हीही व्हाल हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हायवेवर किंवा एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना तुम्ही अनेक वाहनांच्या पाठीमागे Horn OK Please असं लिहिलेलं बघितलं असेल. खास करून प्रत्येक ट्र्कच्या पाठीमागे हे 3 शब्द असतातच. तुम्हाला कायम प्रश्न पडला असेल कि असं का लिहिलं जातं? यामागील नेमकं लॉजिक काय आहे? तर आज तुम्ही तुमच्या या प्रश्नाचं निरसन करणार असून तुमच्या जनरल नॉलेज मध्ये आणखी भर घालणार आहोत. चला तर जाणून घेऊया या 3 शब्दांचे अर्थ आणि ते ट्र्कच्या पाठीमागे लिहिण्याचे कारण….

Horn Please चा अर्थ काय ?

Horn Please चा अर्थ असा आहे की, जर तुम्ही ट्र्कला ओव्हरटेक करणार असाल तर तुम्ही हॉर्न वाजवा जेणेकरून ट्रक चालकाला कळेल की तुम्ही त्यांच्या मागे आहात. हॉर्न वाजवल्याने वाहनाकडे लक्ष जाते आणि अपघाताची घटना टळते. ट्रक हे मोठे वाहन असल्याने काही वेळा चारही बाजूने वाहने येताना दिसत नाहीत आणि पूर्वीच्या काळात अनेक ट्रकमध्ये दोन्ही बाजूला आरसे नव्हते, त्यामुळे Horn Please लिहिणे गरजेचं होते.

OK चा अर्थ काय ?

वर तुम्ही Horn Please चा अर्थ आणि ते का लिहिले जातं हे समजून घेतलं असेल पण आता OK चा अर्थ काय ? आणि ते कशासाठी लिहिलं जातंय असा प्रश्न अजूनही तुमच्या मनात कायम असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो, की याचा संबंध थेट दुसऱ्या महायुद्धाशी जोडला गेला आहे. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जगात डिझेलचा मोठा तुटवडा होता त्यामुळे ट्रक रॉकेलने भरले जात होते. परंतु रॉकेल खूप ज्वलनशील असल्याने त्याला आग लागण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून इतर वाहनांना वाहनात रॉकेल भरल्याचे सांगण्यासाठी ओके म्हणजे ऑन केरोसीन असे लिहिले होते, परंतु अजूनही ते शब्द ट्रकवर कायम दिसतात.