मोबाईल कॅमेरा शक्यतो डाव्या बाजूलाच का असतो?? ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या जगात मोबाइल ही जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईलच्या सहाय्याने आपलं जीवन सुखकर झालं आहे. मोबाईल द्वारे आपण लांब राहणाऱ्या व्यक्तीसोबत कुठूनही संवाद साधू शकतो. तसेच एकमेकांना फोटो, विडिओ मोबाइलच्याच माध्यमातून आरामात पाठवू शकतो. मोबाईल हे मनोरंजनाचेही साधन बनले आहे. जर तुमच्याकडेही स्मार्टफोन असेल तर त्याचा कॅमेरा डाव्या बाजूला असलेला तुमच्या लक्षात आले असेल. बहुतेक मोबाईल फोन्समध्ये कॅमेरा फक्त डाव्या बाजूला बसवला जातो. पण यामागे काय कारण आहे याचा कधी विचार केला आहे का? चला जाणून घेऊया ….

सुरुवातीला स्मार्ट फोनच्या मध्यभागी कॅमेरे दिले जात होते, पण नंतर हळूहळू हे कॅमेरे मोबाइलच्या डाव्या बाजूला येऊ लागले. त्याची सुरुवात प्रथम आयफोनने केली होती. यानंतर बहुतके सर्व कंपन्यांनी डाव्या बाजूला कॅमेरे देण्यास सुरुवात केली. मोबाईल कॅमेरा डाव्या बाजूला असण्यामागचं कारण मोबाईलचं डिझाईन नव्हे तर वेगळंच कारण आहे.

बहुतेक लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा स्थितीत डाव्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याने फोटो किंवा व्हिडीओ शूट करणे सोपे जाते. याशिवाय आपण कॅमेरा फिरवून लँडस्केप करतो, तेव्हा मोबाईलचा कॅमेरा वरच्या दिशेने येतो, ज्यामुळे आपण सहजपणे लँडस्केप फोटो घेऊ शकतो. यासाठी मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरे बसवले जातात.

सेल्फी कॅमेरामध्ये असतो मिरर इफेक्ट-

याशिवाय, तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा आपण फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फी घेतो तेव्हा तो उलटा येतो. म्हणजेच, त्याची स्थिती डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे होते. अशा परिस्थितीत, असे होते की आपल्या सेल्फीमध्ये लिहिलेले नाव उलट होते. बहुतेक मोबाईलमध्ये ही समस्या असते. वास्तविक, बहुतेक मोबाईलमधील सेल्फी कॅमेरामध्ये मिरर इफेक्ट असतो. याच कारणामुळे जेव्हा कोणी सेल्फी घेतो तेव्हा तो कॅमेऱ्यात सरळ दिसतो, पण फोटो काढल्यानंतर तो फोटो उलटा होतो.