डाॅल्बी का नको? वाजलीच पाहिजेच : छ. उदयनराजे भोसले आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आपल्या जिल्ह्यात शिरवळला सगळ्या केमिकल्सच्या इंडस्ट्रीज आहेत. पर्यावरणाला धोका आहे, अशा कंपन्या आहेत. तिथे ट्रीटमेंट प्लॅन्ट नाहीत. तेव्हा तुम्ही काही करत नाही. कॅन्सर आजार असलेले 60 ते 70 टक्के लोक आज आहेत. मग मला सांगा, डाॅल्बीने काय केले आहे की डाॅल्बी नकोच. मी तर म्हणतो, डाॅल्बी पाहिजेच अन् वाजलीच पाहिजे, असे आक्रमकपणे भाजप खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

सातारा येथे छ. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गणेश उत्सव काळात साताऱ्यात डाॅल्बी सिस्टमला परवानगी नसल्याचं पोलीस दलाने जाहीर केल, त्यानंतर छ. उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, ज्या लोकांनी डाॅल्बी विकत घेतले आहे, त्यांनी काय करायचे. तुम्ही त्यांची डाॅल्बी घ्या, त्याचे पैसे द्या अन् तुम्हांला त्या डाॅल्बीचे जे काही करायचे ते करा. ज्यांनी गुंतवणूक केली आहे. त्याचा तुम्ही विचार करणार आहे की नाही. डाॅल्बी व्यावसायिकाचे सर्व काही व्यवस्थित असते, तर त्यांनी गुंतवणूक केली असती का?

डाॅल्बी का नको अधिकाऱ्यांनी सांगावे ः- आज जे प्रशासनातील अधिकारी आहेत, त्यांना शासनाकडून पगार मिळतो. कुठला तरी लोकप्रतिनिधी सांगतो, हे करा, ते करू नका. कोण हे सांगणार लोकप्रतिनिधी. आज प्रशासनातील अधिकारी वर्ग सुदैवाने चांगले शिक्षण घेवून, परिस्थिती बदली. परंतु ते झालं नसते तर त्यांनाही हा व्यवसाय करावा लागला असता. त्यामुळे डाॅल्बी हा काही विद्रुप प्रकार आहे किंवा संकट आहे असे काही नाही. डाॅल्बीला परवानगी दिली पाहिजे, अन् का नाही दिली पाहिजे. शासनाने उत्तर द्यावे, परंतु डाॅल्बी वाजलीच पाहिजे. 2-3 तास डाॅल्बी चालली म्हणजे असे काय आभाळ कोसळते. ज्याचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अंबलवून आहे, त्यांचे सगळं कोसळेल. तेव्हा डाॅल्बी चालू झालीच पाहिजे.