भरबाजारात बायकोने केली नवऱ्याची धुलाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – आपण नवरा बायकोची भांडणे पहिलीच असतील. सध्या अशा एका दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये बायको आपल्या नवऱ्याची धुलाई (wife beat husband) करताना दिसत आहे. भरबाजारात या महिलेने आपल्या पतीला मारले आहे. फक्त 6 सेकंदात चेहऱ्यावर चपलेने तब्बल 6 वार करत तिने त्याचं तोंड लाल केलं आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ (wife beat husband) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने भरबाजारात आपल्या नवऱ्याची धुलाई (wife beat husband) केली आहे. हा हायवोल्टेज ड्रामा पाहण्यासाठी नागरिकांनी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या लोकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
मिळालेल्या माहितीनुसार दामप्त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून काही कारणामुळे वाद सुरू आहेत. हाच वाद इतका विकोपाला गेला की महिलेच्या रागाचा पारा चढला. तिचा राग रस्त्यावर उफाळून आला आणि भररस्त्यात तिने आपल्या नवऱ्याला चपलेने चोपून (wife beat husband) काढलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!