Tuesday, February 7, 2023

लग्नानंतर 21 दिवसांतच बायकोने नवऱ्याला संपवलं; धक्कादायक कारण उघड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पती आवडत नसल्याने लग्नाला फक्त २१ दिवस झालं असतानाच निर्दयी पत्नीने आपल्या नवऱ्याची गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सदर आरोपी पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय.

याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, २१ दिवसांपूर्वीच सदर मृत पती पांडुरंग चव्हाण याचा विवाह शितल या तरुणीशी झाला. परंतु लग्नापासूनच पांडुरंग हा शीतलला आवडत नव्हता. या दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. पांडुरंगच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा समजवून देखील शीतलच्या वागण्यात बदल होत नव्हता. त्यांनतर अचानक 8 नोव्हेंबर रोजी शितल बेडरुममधून बाहेर येऊन आरडा ओरडा करु लागली. तिने पांडुरंगाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितल्यावर कुटुंबीयांनी तात्काळ पांडुरंगला रुग्णालयात नेलं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण तपासादरम्यान मृत पांडुरंच्या गळ्याभोवती काही खून दिसल्या. त्यामुळे पांडुरंगचा गळा दाबून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

यानंतर पांडुरंगच्या आईने शीतल विरोधात गेवराई पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. शितलने पांडुरंगला मारल्याचं आरोप सासू-सासऱ्यांनी केला. यांनतर पोलिसांनी शीतलला ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली असता आपणच पांडुरंगची गळा दाबून हत्या केल्याचं तिने कबूल केलं. या संपूर्ण प्रकरणाने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.