Wednesday, February 1, 2023

अनैतिक संबंधातून नवऱ्याचा काटा काढला; पण ‘त्या’ कॉल रेकॉर्डिंग मुळे….

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे . मात्र मोबाइल मधील कॉल रेकॉर्डिंग मुळे तब्बल ३ महिन्यांनी या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी रंजना रामटेके (वय ५० वर्षे) आणि प्रियकर मुकेश त्रिवेदी (वय ४८ वर्ष) याना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्याम रामटेके (वय ६६ वर्ष) यांचा 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हार्ट अटॅकने त्यांचा झोपेत मृत्यू झाल्याचं पत्नीकडून सांगण्यात आलं. त्यांचं वय पाहता सर्वाना ते खरंही वाटलं . वडिलांचं निधन झाल्याने त्यांच्या नागपुरात असलेल्या दोन्ही मुली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आल्या. वडिलांचे अंत्यसंस्कारही केले.

- Advertisement -

आई घरी एकटीच राहत असल्याने तिची लहान मुलगी लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. त्यावेळी आईच्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्डिंग ऐकताच तिला धक्का बसला. वास्तविक, त्या मुलीने वडिलांच्या मृत्यूपूर्वी आईला एक मोबाईल दिला होता. या फोनमध्ये असलेली एक ऑडिओ क्लिप या मुलीच्या हाती लागली. या क्लिप मध्ये सदर आरोपी महिला आणि तिचा प्रियकर त्रिवेदी यांचे ६ ऑगस्ट २०२२ ला पहाटे २.१४ वाजता तब्बल १०.५७ मिनिटांचे संभाषण दिसले. यामध्ये आपल्या पतीचा खून आपण कसा केला याची माहिती आरोपी महिला प्रियकराला देते.

नवऱ्याचे हात बांधून, विष पाहून आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून आपण पतीचा खून केला असा उल्लेख आहे. त्यानंतर त्रिवेदी याने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना हृदयविकाराने पतीचा मृत्यू झाला असं सर्वाना सांगण्याचा सल्ला दिल्याचेही त्या संभाषणात आढळले. यांनतर मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठत आईविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसानी कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींची आपला गुन्हा मान्य करत खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रंजना रामटेके मुकेश त्रिवेदी यांना अटक केली आहे.