कलियुगातील ‘सावित्री’ने स्वतःचा ‘प्राण’ फुंकून पतीचा वाचवला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – तुम्ही लहानपणी सत्यवान-सावित्रीची कहाणी ऐकली असेल. यामध्ये सावित्री कशाप्रकारे मृत पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवते. अशाच एका गोष्टीतल्या नाही तर खऱ्याखुऱ्या कलियुगातील सावित्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने आपल्या पतीमध्ये आपला प्राण (heart attack) फुंकून त्याचा जीव वाचवला आहे. तिने आपल्या पतीला मृत्यूच्या (heart attack) दारातून बाहेर काढले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
67 वर्षांचे केशवन आपली पत्नी दयासोबत कोइंबतूर एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होते. दिल्लीहून ते कोझिकोडला जात होते. तेव्हा अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना चालत्या ट्रेनमध्ये हार्ट अटॅक (heart attack) आला. जशी ट्रेन मथुरा स्टेशनवर आली तसं इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांना मथुरा स्टेशनवर उतरवण्यात आलं. तिथं आरपीएफ जवान तात्काळ मदतीसाठी धावून आले.

हार्ट अटॅक (heart attack) आल्यानंतर आपात्कालीन परिस्थिती सीपीआर वरदान ठरतो. त्यामुळे केशवन यांना सीपीआर देण्यात आला. सीपीआर हा छातीवर हातांनी दाब देऊन किंवा तोंडाने श्वास देऊन दिला जातो. केशवन यांना दोन्ही पद्धतीने सीपीआर देण्यात आला. आरपीएफ जवानांनी त्यांना चेस्ट सीपीआर दिला तर त्यांच्या पत्नीने त्यांना माऊथ सीपीआर दिला. यानंतर चमत्कार झाला आणि मृत शरीरात हालचाल जाणवू लागली. यानंतर त्या ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचली आणि केशवन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय