Tuesday, January 7, 2025

Big Boss 18 लवकर गुंडाळणार ? सलमान खान साठी मेकर्सचा मोठा निर्णय ?

रिऍलिटी शो चा बाप समाजाला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’… या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान आहे. एवढेच नाही तर त्याच्यामुळेच हा शो सुपरहिट असल्याचे मानले जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या ‘Big Boss 18’ हा शो लवकर गुंडाळला जाण्याची चर्चा आहे. बिग बॉस सुरू होऊन अवघ्या काही वेळातच सलमानच्या जवळचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. त्याचा थेट परिणाम सलमान खानवर झाला. या मृत्यूची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमानची झोप उडाली आहे आणि त्यामुळे त्याने त्याच्या सर्व मिटिंग रद्द केल्याची माहिती आहे, असा दावाही आता रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याच वेळी, बिग बॉस 18 देखील लवकरच पॅक अप होऊ शकते असे बोलले जात आहे.

सलमान खान बिग बॉस 18 होस्ट करणार नाही ?

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा कडक केली आहे. दरम्यान, बिग बॉस 18 च्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. बिग बॉस 18 च्या या वीकेंडचा वार एपिसोड सलमान खान होस्ट करणार नाही. सलमान खानच्या सुरक्षेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळापूर्वी सलमान खानची सुरक्षा Z वरून Y करण्यात आली आहे. या बातमीने बिग बॉस 18 च्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सलमान खानलाही विनाकारण प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आठवड्यात तो ‘बिग बॉस 18’ च्या ‘विकेंडच्या वार’ मध्येही दिसणार नाही. याचे कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँग, ज्या गॅन्ग ने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या सर्व कारणांमुळे सलमान त्याच्या कमिटमेंटशी तडजोड करेल. फराह खान सलमान खानच्या जागी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी वीकेंड का वार होस्ट करताना दिसण्याची शक्यता आहे.

याआधीही तिने बिग बॉस होस्ट केले आहे. मात्र, या बातमीवर बिग बॉस 18 च्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बाबा सिद्दीकींची हत्या झाली तेव्हा सलमान बिग बॉसच्या सेटवर होता आणि ही बातमी मिळताच तो सेटवरून निघून गेला.