दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती 65000 पार जाणार? काय असू शकतात दरवाढीची कारणे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणवार म्हंटल की दागिन्यांची आरास घातली जाते. त्यासाठी सोने चांदीच्या दरात कपात व वाढ केली जाते.  सोने हा असाच एक गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. ज्याला विना टेंशन गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवायचा असतो तो हमखास सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो. आताही सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. याचे कारण म्हणजे दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती 65000 पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिवाळीपर्यंत होईल सुमारे 3,500 रुपयांची वाढ

आत्ता सोन्याचे दर 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. दिवाळीपर्यंत त्यात आणखी सुमारे 3,500 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात जरी वाढ झाली तरीसुद्धा लोक त्याची खरेदी मोठ्याप्रमाणात करतील असे कमोडीटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विक्रेत्यांसाठी ही आनंदाची बाबा मानली जातीये.

सोन्याच्या दरात वृद्धी का होते? 

सोन्याच्या किमती विविध घटकांनी प्रभावित होतात जे पुरवठा आणि मागणीच्या गतिशीलतेवर परिणाम करतात. सोन्याच्या दरांवर परिणाम करणारे काही प्रमुख घटक हे समाविष्ट आहेत: जागतिक आर्थिक परिस्थिती: चलनवाढ, व्याजदर आणि चलनातील चढउतार यासारख्या आर्थिक निर्देशकांचा सोन्याच्या किमतीवर लक्षणीय परिणाम होतो.

विदेशात होणार 2150 डॉलर सोन

केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही सोन्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. जवळजवळ 2150 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

या कारणांमुळे वाढेल सोन्याची चमक 

1) भू-राजकीय तणावामुळे युरोपसह इतर मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अनिश्चितता कायम आहे.

2) मॉर्गन स्टॅनलीने यापूर्वीच अमेरिकेचे रेटिंग कमी केले आहे. आता जेपी मॉर्गनने चीनचे रेटिंग कमी केले आहे.

3)अमेरिकेसह इतर देशांमध्ये महागाई नियंत्रणाबाहेर आहे. डॉलरची घसरण सुरूच आहे.

4)आगामी सण आणि लग्नाचा हंगाम पाहता देशांतर्गत सोन्याची मागणी वाढेल.