सीमावादावर मोदी महाराष्ट्राच्या बाजूने बोलणार का? बोम्मईंना समज देणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. सीमावादावर मोदी महाराष्ट्राच्या बाजूने बोलणार का? बोम्मईंना समज देणार का? असा थेट सवाल त्यांनी केला. आज ठाण्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

बेळगाव, कारवार तर दूरच पण आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर आपला हक्क सांगत आहे. एकीकडे बोम्मई जोरात बोलत असताना आपले मुख्यमंत्री मात्र काहीच बोलत नाहीत. केंद्रात भाजपचे सरकार आहे, कर्नाटकात भाजपचे सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपचेच सरकार आहे. मग अशावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात मोदी महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत का? बोम्मई याना त्यांनीच मुख्यमंत्री केलंय मग मोदी त्यांना समज देणार का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

या सर्व पार्श्वभूमीवर येत्या १७ डिसेंबर ला महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. त्यावेळी पूर्ण ताकदीने अक्खा महाराष्ट्र एकवटणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या उदघाटन वरूनही ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. सगळं काय मीच केलं असं असं काही जणांना वाटत असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे फडणवीसांवर निशाणा साधला.