भारताने INDIA नाव काढून टाकल्यावर पाकिस्तान ‘इंडिया’ वर दावा करणार? त्या ट्विटने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे इंडिया हे नाव काढून त्याजागी भारत हे नाव करण्याच्या हालचाली केंद्र सरकार कडून सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. G20 शिखर परिषदेच्या अधिकृत निमंत्रणांवर पारंपारिक ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी – ‘भारताचे राष्ट्रपती’ वापरल्याने खळबळ उडाली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर झालेल्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलं असून देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. याच दरम्यान आता भारताने इंडिया नाव सोडल्यास पाकिस्तान या नावावर दावा करणार असलयाचे ट्विट व्हायरल झालं असून मोठी खळबळ उडाली आहे.

“साऊथ आशिया इंडेक्स ” ने केलेल्या रिपोर्ट नुसार, जर भारताने संयुक्त राष्ट्र स्तरावर अधिकृतपणे इंडिया हे नाव रद्द केलं तर पाकिस्तान “India” नावावर दावा करू शकतो. सिंधू ( Indus ) नदीच्या नावावरून इंडिया हे पडलेले आहे तर सध्या हा प्रदेश आजच्या पाकिस्तान मध्ये येत असल्यामुळे पाकिस्तान ह्या नावावर दावा करू शकते . पाकिस्तानमधील काही राष्ट्रवादी घटकांनी याआधीदेखील इंडिया हे नाव इंड्स प्रदेशावरून पडलं असल्याचे सांगत दावा केला होता. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मात्र देशाचे नाव बदलण्याच्याच्या चर्चा फेंटाळून लावल्या आहेत. ही केवळ अफवा आहे. मला एवढेच सांगायचे आहे की ज्याला भारत या शब्दावर आक्षेप आहे, तो त्याची मानसिकता स्पष्टपणे दाखवत आहे. ते परदेशात गेल्यावर भारतावर टीका करतात. ते भारतात असताना त्यांना भारताच्या नावावर आक्षेप आहे. जर राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रावर त्यांनी म्हटले की ते भारताचे राष्ट्रपती आहेत, म्हणून त्यांनी भारताचे राष्ट्रपती असे लिहिले. त्यात काय बिघडलं असा सवाल अनुराग ठाकूर यांनी केला.