राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रहदारी देखील वाढत असून गाड्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या पुण्यामध्ये निर्माण झाली असून पुणेकरांना तासंतास वाहतुकीत घालवावा लागतो आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्लान सांगितला. आज पुण्यात सात नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना वाहतूक कोंडी विषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की,” पुण्यात वाहतूक खूप वाढली आहे. यामध्ये अधिकारी वाढवायचा निर्णय घेतला आहे. एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त देणार आहोत त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयोग होईल असे ते म्हणाले.
याच कार्यक्रमात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “आजच आपण सायबर सेंटर सुरू करत आहोत साडेसातशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला आहे. अनेकदा पैसे जातात येत नाहीत ते म्हणालेत मागच्या काळात आपण गुगल सोबत एक करार केला आहे. त्यात आता एआय उपयोग करायचा. यामुळे पोलिसांचे काम सोपे होणार आहे. ट्रॅफिक साठी याचा उपयोग होणार आहे त्यात सगळं शक्य आहे ड्रोनचाही वापर केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
देशात नवीन तीन कायदे आणले आहेत. पोलिसांच्या वर जास्त जबाबदारी टाकली आहे 2014 नंतर आपण निर्णय घेतला की टेक्निकल पुरावे गोळा करून गुन्हे सिद्ध करण्यास मदत होत आहे. माझ्या काळात चाळीस हजार पोलीस भरती केली आहे. कमी संख्या होती गुन्हे घडताना दिसत आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तोवर गुन्हे घडणार. त्यांना शिक्षा होते का त्याची उकल होते का ? लोकांना सेफ वाटतं का ? हे महत्त्वाचं आहे असं ते यावेळी बोलताना म्हणाले.