सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येणार का? NASA अन SpaceX ची विशेष मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात अडकले आहेत. नासाने या दोन अंतराळवीरांना परत आणण्याची योजना आखली होती, त्यासाठी क्रू-10 मिशन तयार केले होते. पण अचानक रॉकेटच्या लाँचपॅडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे स्पेसएक्सने क्रू-10 चे प्रक्षेपण रद्द केले. त्यामुळे आता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत येण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

नासा आणि स्पेस एक्सची विशेष मोहीम

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत मिळून काम करत आहे. यासाठी स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल वापरण्यात येणार आलं. १२ मार्च रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाणार होते. यामध्ये, स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन ९ अवकाशात पाठवणार होते, ज्यामध्ये चार अंतराळवीर अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे क्रू-10 ची मोहीम रद्द केली गेली आहे.

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येणार का?

12 मार्चची मोहीम जरी अपयशी ठरली असली तरी 15 मार्चला म्हणजेच उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा मोहीम राबवण्यात येणार असून विल्यमन्स यांना पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

अंतराळात विल्यम्स यांच्या जीवाला धोका?

अंतराळात अडकलेल्या विल्यम्स यांची गुरुत्वाकर्षणमुळे हाडे ठिसुळ होऊ शकतात. लाल रक्तपेशींचा धोका आणि त्यांची नजर देखील कमजोर होऊ शकते.पृथ्वीवर परत आल्यावरही जास्त काळासाठी अंतराळात राहिल्यामुळे त्या जमिनीवर चालायच्या विसरू शकतात. किंवा त्यांना अंधत्वाचा धोका देखील असू शकतो. मात्र वर्षभराच्या व्यायाम आणि शारीरिक श्रमानंतर त्या पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकतात. पण त्यासाठी सर्वात अगोदर त्यांना पृथ्वीवर पुन्हा आणणे हा महत्वाचा टास्क असणार आहे.