राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? अजित पवारांनी दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मंगळवारी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा उचलून धरत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचक संकेत दिले. तसेच, विधानसभा निवडणुकीपूर्वीच जुन्या पेन्शनवर निर्णय होणार असल्याचे देखील सांगितले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवार म्हणाले की, “हे सरकार मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही चिंता करु नका. त्यानंतर सहा महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला अश्वस्थ करु इच्छितो की विधानसभा निवडणूक लागायच्या आधी या जुन्या पेन्शनच्या संदर्भात हे सरकार निश्चितपणे निर्णय घेईल” अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शन योजनेसाठी यशवंत स्टेडियमवर हजारों सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी बऱ्याच दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात पेन्शनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळेस अजित पवार यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे सुतोवाच केले.