श्रावण महिना सुरू झाल्यापासून भारतीय सणांना सुरुवात होत असते. या सणासुदीच्या काळामध्ये अनेक जणांकडून खरेदी केली जाते. त्यामध्ये गाड्यांच्या खरेदीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या देखील सणादरम्यान विशेष सूट ग्राहकांना देत असतात. एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या रिपोर्टनुसार जर एखाद्या ग्राहकाने त्याची जुनी गाडी स्क्रॅप करून नवीन गाडी खरेदी करत असेल तर त्या व्यक्तीला यांना नवीन गाडीवर १.५ ते ३.५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार असल्याची माहिती आहे. पण या निर्णया मागे रस्ते विकास आणि परिवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांचा हात असल्याचं बोललं जात आहे चला जाणून घेऊया काय आहे नक्की हे प्रकरण?
माध्यमांच्या रिपोर्टनुसार काही टॉप लक्झरी कार कंपन्या जवळपास 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यासाठी तयार झालया आहेत तर इतर कंपन्याही तितकाच डिस्काउंट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंडस्ट्री आणि सरकार या प्लांटची घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान 2021 मध्ये नितीन गडकरी यांनी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली होती या घोषणेनंतर गडकरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ग्राहकांना त्यांच्या जुन्या कार स्क्रॅप करून त्यावर डिस्काउंट आणि कमी जीएसटी यासारखी सूट मिळण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर 2022 मध्ये मंत्रालयाने ऑटोमोबाईल युनियन्सना त्यांच्या ग्राहकांना स्क्रॅपिंग वाहनांच्या बदल्यात विक्री किमतीवर पाच टक्के पर्यंत सूट द्यायला सांगितलं होतं. परंतु कंपन्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. सरकारने 60 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा आणि 75 स्वयंचलित चाचणी केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काय आहे नक्की स्क्रॅपिंग पॉलिसी?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना 26 जुलै 2019 रोजी मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या पंधरा वर्षांहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर देशात स्क्रॅपिंग पॉलिसी अमलात आणली गेली. जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर त्याला आपल्याला पाच टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल मात्र या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे असं सांगण्यात आलं होतं.