हिवाळ्यात महाराष्ट्रातील या अप्रतिम ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात होईल ट्रिप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा चालू झाला की, अनेक लोक फिरायला जात असतात. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये सर्वात जास्त लोक फिरायला जातात. या कालावधीत हवेमध्ये गारवा असतो. आणि वातावरण देखील अत्यंत छान असते. त्यामुळे अनेक लोक या महिन्यांमध्ये ट्रीपचे नियोजन करत असतात. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशी काही ठीकानंबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही हिवाळ्यात चांगला अनुभव घेऊ शकता. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. तसेच शांतता देखील अनुभवता येईल. आता महाराष्ट्रातील अशाच ठिकाणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

खंडाळा

Khandala

हिवाळ्यातील ट्रीपसाठी खंडाळा हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. पश्चिम घाट पर्वत रांगेत खंडाळा वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरव्यागार डोंगरदऱ्या, धबधबे निसर्गाचा आनंद घेता येईल. त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या बजेटमध्ये ही प्लॅन करू शकता.

पाचगणी

Pachgani

पाचगणी मध्ये अनेक भव्य टेकड्या आहेत. तसेच या ठिकाणी तुम्हाला सिडनी पॉईंट, टेबल लँड, राजपुरी लेणी यांसारखी अनेक आकर्षक ठिकाणी देखील पाहायला मिळतील. ज्या लोकांना एडवेंचर्स करायचे आहेत. त्यांच्यासाठी हे ठिकाण खूप चांगले आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला घोडेस्वारी, रॉक क्लाइंबिंग, स्पीड बोटिंग यांसारख्या एडवेंचर्सचा आनंद घेता येईल.

माथेरान

Matheran

तुम्हाला जर हिवाळ्यातला सनराइज आणि सनसेट पाहायचा असेल, तर त्यासाठी माथेरान हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. माथेरानला अनेक लोक भेट देत असतात. तसेच या ठिकाणी तुम्हाला ट्रेक करता येईल. आणि इतर ऍक्टिव्हिटी देखील करता येईल. माथेरानचे वातावरण अत्यंत आनंददायी आहे. या ठिकाणी गाड्यांची गर्दी नसते. त्यामुळे प्रदूषण ही जास्त होत नाही. तुम्ही घोड्याने किंवा त्यांच्या ट्रेनने या ठिकाणाला भेट देऊ शकता.

नाशिक

Nashik

नाशिक हे एक धार्मिक शहर आहे. दर बारा वर्षांनी नाशिक मध्ये कुंभमेळा भरवला जातो. तुम्ही नाशिक मध्ये देखील हिवाळ्यात भेट देऊ शकता. हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला सुला वाईन्स, कॉइन म्युझियम, रामकुंड यांसारखी ठिकाणे पाहायला मिळेल.

भीमाशंकर

Bhimashankar

भीमाशंकर हे देखील हिवाळ्यात भेट देण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणचे तापमान जवळपास 13 ते 30°c पर्यंत असते. तसेच या ठिकाणी तुम्हाला अनेक वन्यजीव पाहायला मिळतील. अनेक वनस्पतींनी हे ठिकाण वेढलेले आहे.

ताडोबा

Tadoba

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे ठिकाण हिवाळी ट्रिपसाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत. यात तुम्हाला वाघ, हरणांच्या प्रजाती, अस्वल, मगरी सी वेहर्स यांसारखे अनेक प्राणी पाहायला मिळतील. तसेच येथे चांगले निसर्ग वातावरण देखील आहे.