हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार कंपनी 10,000 ते 12,000 लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय होणाऱ्या नियुक्त्यांचा समावेश असेल. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक Wipro 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुती 2025 च्या आर्थिक वर्षात करणार आहे. त्यामुळे IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी हि मोठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.
30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी सुद्धा अशाच प्रकारे तब्बल 10,000 ते 12,000 नोकर भरतीची योजना आखली आहे. आम्ही पुन्हा एकदा नोकरभरती करणार आहोत असं मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाई परिषदेदरम्यान सांगितले.
ते पुढे म्हणाले, विप्रो FY25 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. आम्ही काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आमचा युटिलायझेशन रेशो सर्वोच्च शिखरावर असून त्यामुळे आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे. असे गोविल यांनी सांगितलं.