आंबा खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा सिजन संपला कि आंबे मिळेण कठिण होते. मात्र ज्यांना आंबा खायचाच आहे त्यांच्यासाठी कृत्रिमरित्या वेगवेगळ्या औषधांचा वापर करुन आंबे पिकवले जातात. पुढे हेच आंबे बाजारात देखील विक्रिसाठी आणले जातात. परंतु अनेकवेळा हे कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेले आंबे घातक ठरले जातात. अशीच एक घटना इंदौर याठिकाणी घडली आहे. इथे एका महिलेला आंबा खाणे जिवावर बेतले आहे.

इंदौरमधील बिजलपुर येथे राहणाऱ्या अर्चना अलेरिया या महिलेचा आंबा खाल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आहे. सध्या या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस पोस्टमार्टमचा अहवाल येण्याची वाट पाहत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर सर्व सत्य माहिती समोर येण्याची त्यांना आशा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दुपारी जेवण केल्यानंतर अर्चनाला अचानक चक्कर आली आणि ती बेशुध्द पडली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाल्याची बातमी डॉक्टरांनी तिच्या कुटूंबियांना दिली. याबाबत अर्चनाच्या सासऱ्यांनी पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितला आहे.

त्यानुसार अर्चनाने दुपारी जेवण केले आणि त्यावेळी तिने बाजारातून आणलेले आंबे खाल्ले. परंतु थोड्याच वेळात तीला चक्कर आली तिला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ती उठली नाही. यानंतर तिला रुग्णालयात आणले गेले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी थेट तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेसंदर्भात पोलिसांनी आंबा विक्रेताची चौकशी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आज काल आंब्यांवर वेगवेगळी विषारी औषधे फवारली जातात. जी मानवाच्या आरोग्यासाठी घातक असतात. महत्वाचे म्हणजे, अर्चना जिथे राहते त्याठिकाणी देखील अशा दोन घटना होऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंबा खाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.