महिला IAS Officer ने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – IAS-IPS अधिकारी म्हटले कि एक अभ्यासू, शिस्तप्रिय, कठोर असे व्यक्तिमहत्तव आपल्या समोर येते. सध्या एका आयएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Ias Officer Viral Video) होत आहे. या महिला आयएएस अधिकाऱ्याने चक्क कॉलेजच्या तरुणींसोबत नगाडा सम ढोल बाजे या गाण्यावर डान्स (Ias Officer Viral Video) करत जबरदस्त ठुमके लगावले आहेत.

काय आहे प्रकरण?
केरळमधील पथानमथित्ता जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Ias Officer Viral Video) होत आहे. यामध्ये त्यांचे एक हटके आणि अनोखं रूप पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये त्या चक्क कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. एमजीयू युनिव्हर्सिटीच्या यूथफेस्टमध्ये त्या सहभागी झाल्या. तिथं काही विद्यार्थी डान्स करत होते. दीपिका पादुकोणचं नगाडे संग ढोल बाजे गाणं वाजत होतं. गाणं ऐकून आणि मुलांना डान्स करताना पाहून डॉ. दिव्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. यानंतर त्यासुद्धा या गाण्यावर थिरकल्या.

या व्हिडिओमध्ये डॉ. दिव्या अगदी बिनधास्त डान्स करताना (Ias Officer Viral Video) दिसत आहे. डान्सची मजा त्या लुटत आहेत. आपण जिल्हाधिकारी आहोत हे विसरून त्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्येच एकरूप झाल्या आहेत आणि त्यांच्यासोबत डान्सच्या स्टेप्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ खूप जुना आहे. मात्र आता तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय