पोटच्या पोराला वाचवण्यासाठी आईने स्वतःवर झेलला वार, पंढरपूरमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अनैतिक संबंधांवरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. दोन कुटुंबातील दोन तरुण आमनेसामने आले. यावेळी आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी 50 वर्षीय महिला पुढे आली. या महिलेने आपल्या पोटच्या मुलावर झालेला वार (sword attack) स्वतःवर झेलला आहे. या हल्ल्यात (sword attack) महिलेच्या मुलाचा जीव वाचला आईचा हात मनगटापासून वेगळा झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हि घटना पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावामध्ये घडली. या घटनेत जयश्री विठ्ठल रणदिवे या जखमी झाल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी मुख्य हल्ला (sword attack) करणारा रामदास सर्जेराव कांबळे याच्यासह सीताराम सर्जेराव कांबळे, हरिदास सर्जेराव कांबळे आणि इंदापूर येथील संतोष उकरंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर वार केल्यामुळे आरोपीला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली.

काय घडले नेमके ?
खर्डी येथील संतोष रणदिवे याच्या अनैतिकसंबंधावरून गुरूवारी सकाळी रणदिवे आणि कांबळे कुटुंबात मोठा वाद झाला. यावेळी रामदास कांबळे याने आपल्या बरोबर कुर्‍हाड तर संतोष उकरंडे याने तलवार आणली होती. यावेळी रामदास याने तलवारीने संतोष रणदिवे याच्यावर हल्ला (sword attack) करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी संतोषची आई जयश्री रणदिवे यांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी तो तलवारीचा वार (sword attack) स्वतःवर झेलला. यामध्ये जयश्री रणदिवे गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपी रामदास कांबळे याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी रामदास सर्जेराव कांबळे याच्यासह सीताराम सर्जेराव कांबळे, हरिदास सर्जेराव कांबळे आणि इंदापूर येथील संतोष उकरंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर