नवऱ्यासाठी महिला बनली सावित्री ! 13 फूट मगरेच्या जबड्यातून वाचवले पतीचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मगर हा एक गिळंकृत प्राणी आहे. म्हणजे तो एखाद्या व्यक्तीला देखील मिळू शकतो. त्या व्यक्तीला गिळल्यानंतर त्या व्यक्तीच्या वाचनाची शक्यता अजिबात नसते. परंतु एक अशी भीतीदायक घटना घडलेली आहे. एका पत्नीने आपल्या पतीला 13 फुटाच्या मगरने गिळण्यापासून वाचवलेले आहे. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील आहे.

दक्षिण आफ्रिकेतील तीन मुलांचे 37 वर्षीय वडील अँथनी जॉबर्ट त्यांच्या कुटुंबासह मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा जेपी हा धरणावर मासेमारी करण्यासाठी काहीतरी टाकत होता आणि परत झेल घेत होता. असे करत असताना त्याचे साहित्य तलावात पडल्याने ते घेण्यासाठी अँथनी तलावात गेला.

त्यावेळी अँथनी यांनी सांगितले की, “मगर तिथे बसलेली होती. अचानक ती पाण्यातून बाहेर आली आली. तिने माझा पाय तिच्या जबड्यात पकडला. आणि मला फेकले. तिथे सर्वत्र पाणी होते. तिने एकदम घट्ट मला धरले होते आणि माझा दुसरा पाय माझ्या बेल्टच्या अगदी खाली तिच्या तोंडात घेतला. तसेच मला उजवीकडून डावीकडे मारायला सुरुवात केली.”

पुढे तो म्हणाला की, “मला माझे पाय दिसत नव्हते. फक्त तिचे दात दिसत होते. तिची भीतीदायक नजर माझ्याकडेच पाहत होती. अगदी खोलवर पाण्यात मी चाललो होतो. परंतु ती मला पाण्यात खोलवर नेईल आणि पूर्णपणे खाईल अशी भीती माझ्या मनात होता होती.

पुढे तो म्हणाला की, माझे पूर्ण शरीर मगरीचा तोंडात होते. माझी पत्नी काठीने धरणाच्या काठावरून पाणी सतत मगरीच्या तोंडावर मारत होती. आणि पाच-सहा काट्या मारल्यानंतर मगरीचा दबडा उघडला आणि पाण्यात पडून निघून गेला.

जखमी अवस्थेत होतो. परंतु मी धोक्यातून बाहेर आलो होतो. माझ्या पायातून रक्तस्त्राव चालू होता. परंतु तो थांबवण्यासाठी त्यांनी टॉवेल आणला. माझ्या पायाला बांधला. यावेळी मी थोडक्यात बचावलो. पण मला वाटते की, माझी वेळ चांगली होती. सुदैवाने माझा मुलगा पाण्यात गेला नाही. तसेच त्याच्या बायकोने सांगितले की आम्ही अँथनीला कसे वाचवले हे आम्हालाच माहिती खूप भीतीदायक घटना होती आणि आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही.