Wednesday, June 7, 2023

गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी वृद्ध महिलेचे सोन्याचं गंठण केले चोरी, CCTV फुटेज आले समोर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे चोरटे (theft) गर्दीचा फायदा घेऊन हात चलाखीने आपला डाव साधतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील इंदापूरमध्ये घडली आहे. या घटनेत बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने सोन्याचं गंठण चोरी (theft) केले आहे.

काय घडले नेमके?
सध्या दिवाळी सण पार पडल्यानंतर सर्वच वाहनांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार (theft) घडला आहे. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलांच्या टोळीने शारदा कांबळे या महिलेचे सोन्याचं गंठण लंपास केले आहे.

हि सगळी चोरीची (theft) घटना बस स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, स्थानकावर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे. बस येताच प्रवासी यात चढू लागले. याच गर्दीचा फायदा घेत या आरोपी महिलांनी आपला डाव साधला. या दोन महिला चोरट्यांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरु आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!