Mumbai News : अटल सेतूवरून उडी मारत महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोधमोहीम सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूचे (Atal Setu) उदघाटन मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. द्डरोज हजारो वाहन या सागरी सेतूवरून प्रवास करत असून वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र आता याच अटल सेतूवरून समुद्रात उडी मारत एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस या महिलेचा शोध घेत असून आत्महत्येचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.

आत्महत्या करणारी सदर महिला ४३ वर्षाची होती. ही महिला मुंबईहून टॅक्सीने अटल सेतूवर आली होती. अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे, असं सांगून टॅक्सी थांबवली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून महिलेने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या (Suicide At Atal Setu) केली. त्यानंतर टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप पोलिसांना यश मिळालं नाही.

ही महिला गेल्या आठ वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होती. “तिला बाहेर काम आहे असे सांगून ती सोमवारी सकाळी घरून निघून गेली. मात्र खूप वेळ होऊनही घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कुटुंबीयांना तिने लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये ती आत्महत्या करण्यासाठी अटल सेतूवर जात असल्याचे लिहिले होते. ज्या टॅक्सी ड्रायव्हरने ती प्रवास करणार आहे, त्याचा छळ करू नये, असेही तिने आपल्या चिट्टीत लिहिले होते.