Monday, February 6, 2023

भुईंजला दसऱ्यानिमित्त महिला व पुरूषांची “प्रो- कबड्डी”

- Advertisement -

वाई | भुईंज (ता. वाई) येथे दसरा उत्सवानिमित्त दरवर्षी मित्र क्रीडा मंडळ भुईंज यांच्यावतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. याहीवर्षी दि. 2 ते 4 ऑक्टोबरपर्यंत पुरूष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन शिवाजी मैदान भुईंज येथे केले आहे. क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी व उपाध्यक्ष किरण शंकर जाधव व सचिन गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.

कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. मदनदादा भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारचे युवराज नाईक, महाराष्ट्र राज्य कबड्डी कार्यकारणी सदस्य व उपाध्यक्ष सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उत्तमराव माने, वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शितल जाणवे खराडे, वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कार्यवाहक डॉ. सुरभि भोसले व भुईंज ग्रामपंचायत सरपंच पुष्पा भोसले यांच्या हस्ते पुरूष आणि महिला कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सामने प्रो कबड्डी धर्तीवर खेळवले जाणार असून यामध्ये ओपन गट पुरूष प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रू. 25 हजार 501 व चषक, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रू. 15 हजार 501 आणि कायम चषक तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रू.11 हजार 101 व कायम चषक असे असणार आहे. त्याचबरोबर आदर्श व शिस्तबद्ध संघास बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येणार असून उत्कृष्ट पकडीसाठी बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय 55 किलो पुरूष गटासाठी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.