घाटीतील संरक्षण भिंतीचे काम जानेवारीत होणार सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | घाटी परिसरामध्ये सतत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते. याचा रुग्णावर परिणाम होतो. म्हणून या घाटी परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आता जानेवारीनंतर ही भिंत बांधण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षापासून घाटी प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घाटी परिसरात 1,600 मीटर भिंत बांधण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत होते. म्हणून आता संरक्षण भिंतीसाठी 3 कोटी 86 लाख 85 हजार 557 रुपये तर घाटीतील ट्रेनिंग साठी चार कोटी 21 लाख 13 हजार 372 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर साडेतीन किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली आहे. हा प्रस्ताव 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी निधी मंजूर केला असल्याचे सांगितले आहे. हा निधी बांधकाम विभागाच्या बजेटमध्ये डिसेंबरच्या शेवटी येईल त्यानंतर टेंडर काढण्यात येणार असून जानेवारीमध्ये हे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ड्रेनेजची पाइपलाइन अद्याप बदलण्यात आलेली नाही. सुरुवातीला टाकण्यात आलेली ही पाइपलाइन चार ते सहा इंच एवढी आहे. ही पाइपलाइन बऱ्याच ठिकाणी फुटलेली असल्यामुळे आता 12 इंच पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. नवीन ड्रेनेज मूळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद यांनी सांगितले. याबाबत सतीश चव्हाण शासनाकडे पाठपुरवठा करत आहे.

Leave a Comment