हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Brain Tumor Day 2024) आजची तरुण मंडळी पैसा आणि लॅव्हिश लाइफस्टाईलच्या मागे धावायच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करत आहेत. यामुळे न केवळ शारीरिक तर मानसिक आरोग्याची देखील मोठ्या प्रमाणावर हानी होते आहे. गेल्या काही काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅक, डायबेटीस, हाय बीपी आणि ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारांचे अनेक रुग्ण आढळणे आले आहेत. आज दिनांक ८ जून असून आज जागतिक स्तरावर ब्रेन ट्युमर दिवस साजरा केला जातो. जागतिक ब्रेन ट्युमर दिनाचे औचित्य साधून आज आपण हा आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे कोणती? आणि तरुणांमध्ये याचे रुग्ण का वाढत आहेत? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
ब्रेन ट्युमर म्हणजे काय? (World Brain Tumor Day 2024)
ब्रेन ट्युमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. मेंदूमध्ये असामान्य पेशी जमा झाल्याने हा आजार होतो. या गंभीर आजारात आपल्या मेंदूमध्ये गाठी तयार होतात आणि हळूहळू या गाठी मोठ्या प्रमाणात वाढतात. माहितीनुसार, ब्रेन ट्युमर झाल्यास तो व्यक्तीच्या कार्यावर आणि एकंदरच संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या ट्युमरला प्राथमिक ट्युमर म्हणतात. हा ट्युमर तुमच्या शरीराच्या वेगळ्या भागात तयार झाल्यानंतर जर तो मेंदूमध्ये पसरत असेल तर त्याला दुय्यम किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्युमर असे म्हटले जाते.
ब्रेन ट्यूमरची लक्षणे
ब्रेन ट्युमर झालेल्या रुग्णात सामान्यपणे दिसून येणारी काही लक्षणे वेळीच लक्षात आल्यावर उपचार घेणे सोपे जाते. (World Brain Tumor Day 2024) यामध्ये खालील लक्षणांचा समावेश आहे.
- वारंवार डोकेदुखी होणे.
- मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे.
- सतत चक्कर येणे.
- मानसिक संतुलन गमावणे.
- अस्पष्ट दृष्टी.
- पाठ आणि मणक्यात वेदना होणे.
- चालताना समस्या येणे.
- स्मृतीभ्रंश होणे.
यावर उपचार काय?
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रेन ट्युमर जितका लवकर समजेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य आहे. या उपचारामध्ये ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. (World Brain Tumor Day 2024) त्यानंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी वापरतात.
तरुणांमध्ये का वाढतेय रुग्णांची संख्या?
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, तरुणांमध्ये ब्रेन ट्यूमरचे प्रमाण वाढण्याचे कारण अनुवांशिक आजार आहेत. आतापर्यंत अनेक तरुण रुग्णांमध्ये मेडुलोब्लास्टोमा आणि एपेंडिमोमा हे सर्वात सामान्य कर्करोग आढळून आले आहेत. न केवळ अनुवांशिक तर ब्रेन ट्युमर होण्याचे मुख्य कारण मोबाईल फोन किंवा डिजिटल स्क्रीनचा अधिक वापर मानले जात आहे. (World Brain Tumor Day 2024) कारण अशा डिजिटल उपकरणांच्या संपर्कात आल्याने डोक्यातील कवटीचे हाड कमकुवत होते. फोनच्या रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होतो आणि मेंदूच्या नसांचे नुकसान होऊन ट्यूमर होण्याची शक्यता वाढते.