Sunday, May 28, 2023

वर्ल्ड चँम्पियन इंग्लंडला मोठा धक्का! आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडने (England) नुकत्याच पार पडलेल्या T-20 वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर (England) 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत सिरीज जिंकली. या पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांची अव्वल स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये न्यूझीलंडचे सध्या 114 पॉईंट पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे तर इंग्लंड 113 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत या यादीत 112 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 112 अंकांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 107 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

जगातील टॉप 10 वनडे टीम
न्यूझीलंड – 114 अंक
इंग्लंड – 113 अंक
भारत – 112 अंक
ऑस्ट्रेलिया – 112 अंक
पाकिस्तान – 107 अंक
द. आफ्रिका – 100 अंक
बांगलादेश – 92 अंक
श्रीलंका – 92 अंक
वेस्ट इंडिज – 71 अंक
अफगाणिस्तान – 69 अंक

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय