World Cup 2023 : कोण जिंकणार यंदाचा वर्ल्डकप? AI ने केली मोठी भविष्यवाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु असून विजेता कोण होईल याबद्दल वेगवेगळ्या भविष्यवाण्या केल्या जात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला सर्वात जास्त पसंती आहे. भारताने सुद्धा सलग सात सामने जिंकत आपली दावेदारी मजबूत केली आहे. त्यातच आता आर्टिफिशल इंटेलिजंट म्हणजेच AI ने सुद्धा भारताच यंदाचा वर्ल्डकप जिंकणार असल्याचं भाकीत केलं आहे. AI ने केलेल्या भाकीतामुळे अनेक भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भारताचा विजय नक्की असे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची गाडी सुसाट – World Cup 2023

सध्या भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात असून आत्तापर्यंत एकही सामना हरलेला नाही. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली शुभमन गिल अप्रतिम खेळ करत आहेत. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव मुळे गोलंदाजीची धार आणखी मजबूत जाई आहे. याचाच परिणाम म्हणजे भारताचा यंदाच्या वर्ल्डकप मध्ये (World Cup 2023) पराभव करणं अजूनही कोणत्या संघाला जमलेलं नाही. भारतीय संघ असाच दमदार खेळ करत राहिला तर AI ची भविष्यवाणी नक्कीच खरी होईल.

गूगलवर सर्च केल्यावर समजते

गूगलकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते. त्याचप्रमाणे आता AI मुळे गूगल भविष्यवानी देखील करू लागले की काय असा प्रश्न पडत आहे. तुम्ही गूगल वर जाऊन ‘बिंग AI’ सर्च केल्यावर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात. त्याचाच वापर करून ही गोष्ट समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे अकाउंट करा लॉगिन AI ला प्रश्न विचारायचे असल्यावर तुम्ही या साईटवर जाऊन तुम्ही तुमचे मायक्रोसॉफ्टचे अकाउंट लॉगिन करून येथे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. हा नवीन पर्याय चांगलाच वापरात येत आहे.

AI कशी मदत करते ?

AI ची भूमिका ही क्रिकेटमध्ये अशातच वाढताना दिसून येत आहे. खेळादरम्यान रिअल टाइममध्ये ते निर्णय घेते. मशीन लर्निंग डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजेच DRS या परिणामांचा विश्वासार्हपणे अंदाज लावू शकते. जवळच्या कॉलमध्ये आणि धावबाद होत असताना, मैदानावरील पंच एका नियुक्त स्टेडियम परिसरात बसलेल्या तिसऱ्या पंचास सूचित करतात. आणि त्यामुळे निकाल समोर येतो. या वाढलेल्या तंत्रज्ञानामुळे केलेली ही भविष्यवानी खरी ठरेल का? असा प्रश्न आता विचारला जातो आहे.