World Cup 2023 : BCCI ने केली मोठी घोषणा!! आता स्टेडियममध्ये मोफत मिळणार ‘ही’ गोष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात  5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भारत क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट सामन्यात मैदाने खचाखच भरली जातात. त्यातच आता या क्रिकेट प्रेमींसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, क्रिकेट स्टेडियमवर सामना मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना पाणी बॉटल मोफत (Free Water Bottle) देण्यात येणार आहे

जय शाह यांनी ट्विट करत दिली माहिती

BCCI चे सध्याचे सचिव  मा. जय शाह (Jay Shah) यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून बीसीसीआय घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयाबाबत माहिती दिली. ट्विट मध्ये जय शाह यांनी म्हंटल की, ” मला जाहीर करताना अभिमान वाटतो की आम्ही देशातील सर्व स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना मोफत बाटलीबंद पाणी देणार आहोत. जय शाह यांनी केलेल्या या घोषणेनंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

किती दिवस चालेल वर्ल्ड कप- World Cup 2023

आयसीसी वर्ल्डकपचा  (World Cup 2023)  5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर असा एकूण 45 दिवस थरार चालणार  आहे. या 45 दिवसात  48 सामने  खेळवले  जातील. शाह  यांनी केलेल्या घोषणेनुसार संपूर्ण आयसीसी वर्ल्ड कप  दरम्यान होणाऱ्या 48 क्रिकेट सामने  पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मोफत मिनिरल पाणी बॉटल्स दिल्या जाणार आहेत.

प्रेक्षकांच्या खिशाला बसणारा चाप थांबणार

कुठल्याही  क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना पाण्याची बॉटल्स किंवा छोटे मोठे अन्नपदार्थ विकत  घेताना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागते . मात्र बीसीसीआयने केलेल्या ह्या घोषणेमुळे  मैदानात क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना पाणी मोफत मिळणार असल्याने त्याच्या खिशाला विनाकारण बसणारा चाप आता बंद होऊन त्यांची तहान भागली जाणार आहे.