World Cup 2023 : आज भारत Vs बांगलादेश लढत; पुण्यात रंगणार सामना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये (World Cup 2023) आज यजमान भारताचा सामना शेजारील देश बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारताने आत्तापर्यतच्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करत आपले पहिले तिन्ही सामने दिमाखदार पद्धतीने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारून आपलं अव्वलस्थान कायम राखण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल.

पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश सामना रंगणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आजची मॅच म्हणजे मोठी पर्वणीच असणार आहे. पुण्यातील मैदान हे नेहमीच फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने आजच्या सामन्यात पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडेल यात शंका नाही. परंतु सर्वात मोठी अडचण ठरेल ती म्हणजे आजच्या पुण्यातील वातावरणातील. पुणे शहरात वातावरण  ढगाळ असण्याची शक्यता आहे. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता कमी  आहे. परंतु पाऊस जर पडला तर खेळावर मात्र ह्याचा परिणाम होताना दिसून येईन.

भारतीय संघ सुपर फॉर्मात – World Cup 2023

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) एकदम सुपर फॉर्मात आहे. स्वतः रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल हे चांगल्या लयीत आहेत. गोलंदाजी मध्ये हुकमी एक्का जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आपली भूमिका चोख पार पाडत आहेत. तर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे संघ एकदम संतुलित वाटत आहे. एकूणच काय तर भारतीय संघाला हरवणं बांगलादेश साठी सोप्प नसेल.