World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा झटका; बड्या खेळाडूला डेंग्यूची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ५ ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी चेन्नई येथील चेपॉक स्टेडियम वर होणार आहे. त्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार आक्रमक युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली असून सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी त्याला मुकावे लागणार आहे.

भारतीय  क्रिकेट टीमसाठी महत्वाचा ओपनिंग फलंदाज असलेला गिल अचानक आजारी पडल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने त्याची टेस्ट करण्यात आली. या अहवालात शुभमन गिल ह्याला डेंगूची लागण  झाल्याचे समोर  आले आहे. शुभमन  गिलला सुरुवातीला फ्लू सदृश्य लक्षणे होती मात्र त्यानंतर  केलेल्या चाचणीत डेंगू आजाराचे निदान झाल्याने टीम  इंडियाला शुभमन  गिल शिवायच आपला पहिला सामना  खेळावा लागू शकतो .आजारी असल्या कारणाने एम. ए. चिंदबरम मैदानावर  घेण्यात आलेल्या  ट्रैनिंग सेशनला देखील उपस्थित राहू शकला  नव्हता.

भारतासाठी महत्वाचा खेळाडू आहे गिल- World Cup 2023

शुभमन  गिलवर सध्या  उपचार  सुरु आहेत. मात्र तो वर्ल्ड साठीचा (World Cup 2023) पहिला  सामना  खेळू  शकेल  की नाही याबाबत शक्यता  कमी  आहे. तरी  देखील आज शुक्रवारी शुभमन गिलच्या होणाऱ्या चाचणी वरून तो पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याबद्दल ठरवण्यात  येणार आहे.  शुभमन  गिल  हा 72.35 च्या सरासरीने आणि 105.03 च्या स्ट्राइक रेटने 1230 धावा करून या वर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला  आहे.  त्याच्या शेवटच्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहेत. त्यामुळे त्याची अनुपस्थिती टीम इंडियासाठी नक्कीच डोकेदुखी ठरेल यात शंकाच नाही. गिलच्या बदली ईशान किशन किंवा के एल राहुल सलामीला रोहित शर्मा सोबत उतरतील.