व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

World Cup 2023: शुबमन गिलची तब्येत आणखी बिघडली!! पाकिस्तान विरूद्ध खेळणं कठीण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या 5 ऑक्टोंबरपासून वन डे वर्ल्ड (World Cup 2023) कपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच टीम इंडियाने (Team India) विजयी शुभारंभ केला आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी झाले आहेत. मात्र आता टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्लेयर असणाऱ्या शुबमन गिलची (Shubman Gill) अचानक तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुबमन गिलला डेंग्युची लागण झाली आहे. यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना देखील खेळता आलेला नाहीये.

शुबमन गिलला डेंगूची लागण झाल्यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे. गेल्या एक आठवड्यापासून शुबमनची तब्येत बिघडलेली होती. मात्र गेल्या दोन दिवसात शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुबमनची तब्येत आणखीन खराब होऊ नये, यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये राहूनच उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या वापसीची शक्यताही फार कमी झाली आहे.

BCCI ने काय म्हंटल- World Cup 2023

मंगळवारी बीसीसीआयने (BCCI) शुबमनच्या तब्येतीविषयी माहिती देताना म्हटले आहे की, शुबमन गिल टीम इंडियासोबत दिल्लीसाठी रवाना झालेला नसून तो चेन्नईमध्येच उपचार घेत आहे. मंगळवारी संध्याकाळी शुबमन गिलचे प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याचा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी दिलेल्या या शुभमनच्या चहात्यांना आणि क्रिकेट प्रेमींना याचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शुबमनची प्रकृती लवकर बरी व्हावी आणि तो पुढील सामन्यासाठी मैदानात दिसावा अशी आशा सर्वजण व्यक्त करत आहेत.

दरम्यान, यावर्षीच्या सामन्यात भारतासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा शुबमन गिल आहे. त्यामुळे शुबमनची अनुपस्थिती टीम इंडियाला अडचणीत आणू शकते. शुभमन गिल हा टीम इंडियामधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्यांची लवकर प्रकृती बरी होणे तितकीच गरजेची आहे. जर पुढील काही काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर त्याला रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील. यामुळे त्याला भारत पाकिस्तान सामन्यात देखील सहभागी होता येणार नाही.